Superstar Allu Arjun’s heartwarming gesture recites ‘Pushpa’s’ famous dialogue for little fan : भारताचा सर्वात लोकप्रिय पॅन-इंडिया सुपरस्टार अल्लू अर्जुनने नुकताच एका लहान चाहतीचे स्वप्न पूर्ण करत तिच्यासाठी अविस्मरणीय आठवण निर्माण केली. अल्लू अर्जुन हा देशातील सर्वात मोठ्या पॅन-इंडिया स्टार्सपैकी एक असून, सर्व वयोगटांमध्ये त्याचा प्रचंड चाहतावर्ग आहे. त्याच्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमुळे आणि विक्रमी बॉक्स ऑफिस यशामुळे तो सिनेसृष्टीतील आयकॉन बनला असला, तरी पडद्यामागील त्याचा साधेपणा आणि आपुलकी यामुळे तो लाखो लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. नुकतेच त्याच्या टीमने एक हृदयस्पर्शी व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये त्याने ‘मेक-अ-विश फाउंडेशन’च्या माध्यमातून एका चिमुकल्या चाहतीची इच्छा पूर्ण केली.
या खास भेटीदरम्यान अल्लू अर्जुनने त्या मुलीशी मनमोकळ्या गप्पा मारल्या, तिच्या तब्येतीची विचारपूस केली आणि ‘पुष्पा’ चित्रपटातील त्याचा प्रसिद्ध डायलॉग “झुकेगा नही साला” तिच्यासोबत पुन्हा साकारला. त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले. तसेच ती बरी झाल्यानंतर हैदराबादला भेट देण्याचे आमंत्रणही त्याने दिले, ज्यामुळे हा क्षण आणखी खास ठरला.
खोटं बोलण्याची सवय अन् अटक कोणत्या परिस्थितीत? माफीचा साक्षीदार पारसमल जैनवर न्यायालयाचा सवाल
‘मेक-अ-विश फाउंडेशन’चा सेलिब्रिटी अॅडव्होकेट म्हणून अल्लू अर्जुन सातत्याने जीवघेण्या आजारांशी झुंज देणाऱ्या मुलांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण आणण्याचा प्रयत्न करत असतो. यामुळे तो केवळ सुपरस्टार नसून समाजासाठी संवेदनशील आणि काळजी घेणारा व्यक्ती असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
पवनराजे निंबाळकर हत्याकांडात अण्णा हजारेंची साक्ष का? पारसमल जैन माफीचा साक्षीदार कसा ठरला?
कामाच्या आघाडीवर बोलायचे झाल्यास, सलग ब्लॉकबस्टर यशानंतर अल्लू अर्जुन भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या स्टार्सपैकी एक म्हणून आपले स्थान अधिक मजबूत करत आहे. आगामी काळात तो दिग्दर्शक अॅटली यांच्या ‘राका’ या चित्रपटात दीपिका पदुकोणसोबत झळकणार आहे. याशिवाय ‘AA23’, ‘पुष्पा 3: द रॅम्पेज’ आणि इतर अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
