Actor Swapnil Joshi : गेल्या काही वर्षात स्वप्नील त्याचा (Swapnil Joshi) वैविध्यपूर्ण भूमिका आणि कामामधून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करताना दिसतोय. पण या भूमिका साकारताना तो विशेष त्याचा लूक्स आणि रोल्स बद्दल देखील तितकाच विचार करतो आणि त्या साकारतो.
रणांगण, समांतर, वाळवी आणि मागच्या वर्षी प्रदर्शित झालेले नवरा माझा नवसाचा २ आणि बाई गं या वर्षी प्रदर्शित झालेला जिलबी प्रत्येक चित्रपटात स्वप्नील त्याचा नवख्या भूमिकेत बघायला मिळाला. स्वप्नीलच्या आजवरच्या प्रत्येक भूमिका तितक्याच ताकदीच्या होत्या यात शंका नाही.
प्रतिक्षा संपली! नवरा माझा नवसाचा रिलीज डेट जाहीर; सचिन-सुप्रियाची धमाल कॉमेडी, जोडीला
स्वप्नीलने त्याची प्रत्येक भूमिका साकारताना त्यातलं वेगळेपणं जपलं आणि प्रेक्षकांना देखील ते भावल आणि म्हणून प्रेक्षक-समीक्षकानी त्याचा प्रत्येक भूमिकेवर तेवढंच प्रेम केलं. चित्रपटाच्या अनोख्या कथा आणि स्वप्नील्याच्या भूमिकांच अचूक टायमिंग हे नेहमीच लक्षवेधी ठरत आलं आहे.
स्वप्नील येणारी प्रत्येक भूमिका अगदीच चोखपणे बजावतो आणि म्हणून २०२५ वर्षात स्वप्नील अजून कमालीचे प्रोजेक्ट्स करणार असून ‘शुभचिंतक’ पहिला वहिला गुजराती चित्रपट तो प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार तर आहे पण सोबतीला निर्माता आणि अभिनेता म्हणून ‘सुशीला -सुजीत’ सारखी हटके कलाकृती मध्ये तो काय भूमिका साकारणार हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे.