Download App

Kamakhya Devi Temple: नवरात्री निमित्ताने मराठमोळा अभिनेता स्वप्नील पोहचला कामाख्या मंदिरात

Swapnil Joshi : सध्या सगळीकडे नवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात आहे, अभिनेता स्वप्नील जोशीने कामाख्या देवीच खास दर्शन घेतलं आहे.

Swapnil Joshi Kamakhya Devi Temple: सध्या सगळीकडे नवरात्रीचा उत्सव (Navratri Celebration) मोठ्या उत्साहाने सुरू असतात अभिनेता निर्माता स्वप्नील जोशीने (Swapnil Joshi) कामाख्या देवीच खास दर्शन घेतलं आहे. कामाच्या धावपळीतून वेळ काढून स्वप्नीलने खास नवरात्रीच्या (Navratri Festival 2024) निमित्तानं कामाख्या देवीच दर्शन (Kamakhya Devi Temple) घेऊन सगळ्यासाठी प्रार्थना केली आहे. स्वप्नीलने सोशल मीडियावर कामाख्या मंदिराची झलक शेयर केली आहे.


2024 वर्ष स्वप्नील साठी अगदीच खास ठरतंय ते त्याचा अनेक नवनवीन प्रोजेक्ट्स ने ! नाच गं घुमा असू दे किंवा बाई गं आणि आताचा ‘नवरा माझा नवसाचा 2’ अश्या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा प्रवास सुरू ठेवून त्याने नुकताच नवा प्रोजेक्ट्स घोषित केला. 2024 मध्ये स्वप्नील ने निर्मिती विश्वात पदार्पण केलं सोबतीने त्याचा वाळवी चित्रपटाला नॅशनल अवॉर्ड सुद्धा मिळाला. स्वप्नील कायम चर्चेत असणारा अभिनेता आहे आणि म्हणून येणाऱ्या काळात तो अनेक प्रोजेक्ट्स घेऊन येणार असल्याचं कळतंय.

स्वप्नील आणि प्रसाद एकत्र

स्वप्नील जोशी आणि प्रसाद ओक यांच्या आगामी सिनेमात नाव सुशीला-सुजीत’ आहे. पहिल्यांदाच स्वप्नील आणि प्रसाद हे एकत्र काम करणार आहेत. त्यामुळे प्रेक्षक त्यांच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहे. अद्याप या चित्रपटाचे पोस्टर किंवा टीझर समोर आलेला नाही.

Swapnil Joshi : स्वप्नील लव्ह ट्रँगल बदलून दिसणार ‘या’ सहा खास अभिनेत्री सोबत

स्वप्नील जोशीच्या कामाविषयी

अनेक मराठी, हिंदी चित्रपट आणि मालिका यांमधून दमदार भूमिका साकरणारा स्वप्नील जोशी इंडस्ट्रीमध्ये चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जातो. तो सध्या आघाडीचा अभिनेता आहे. दुनियादारी, मुंबई-पुणे-मुंबई, मंगलाष्टक वन्स मोअर, फुगे, रणांगण, वाळवी यांसारख्या मराठी तर गुलाम-ए-मुस्तफा, दिल विल प्यार व्यार, लाईफ जिंदगी यांसारख्या हिंदी चित्रपटांत त्याने विविध भूमिका साकारल्या आहेत.

follow us