बुऱ्हानगर येथील नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आ.अक्षय कर्डिले यांची पाहणी, खड्डे बुजवा, कचरा हटवा

आमदार अक्षय कर्डिले यांनी बेलेश्वर चौक ते बुऱ्हानगर, वारूळवाडीमार्गे अहिल्यानगर-संभाजीनगर महामार्गापर्यंतच्या रस्त्याची पाहणी केली.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design   2026 10 08T113459.084

MLA Akshay Kardile conducts an inspection : तुळजाभवानीचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुऱ्हानगर येथील नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी आमदार अक्षय कर्डिले यांनी बेलेश्वर चौक ते बुऱ्हानगर, वारूळवाडीमार्गे अहिल्यानगर-संभाजीनगर महामार्गापर्यंतच्या रस्त्याची पाहणी केली. रस्त्यावरील खड्डे, अस्वच्छता आणि रस्त्यालगत साचलेला कचरा याबाबत प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश त्यांनी दिले.

बुऱ्हानगर देवस्थानात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असून, या काळात जिल्ह्यासह विविध भागांतून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे भाविकांच्या सुरक्षित आणि सुरळीत प्रवासासाठी रस्त्यांची दुरुस्ती, स्वच्छता आणि वाहतुकीच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यावर कर्डिले यांनी भर दिला.पाहणीदरम्यान रस्त्यावरील खड्ड्यांचे तातडीने पॅचिंग करून आवश्यक त्या ठिकाणी डांबरीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

वय वाढेल तसे काही पुढारी अधिकच वेड्यासारखे वागतात, इंदुरीकर महाराजांचे वक्तव्य चर्चेचा विषय

तसेच रस्त्याच्या दुतर्फा पडलेला कचरा तातडीने हटवून स्वच्छता मोहीम राबविण्याचे आदेशही प्रशासनाला देण्यात आले. नवरात्रोत्सवाच्या काळात भाविकांना रस्त्यामुळे कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना कर्डिले यांनी दिल्या.दरम्यान, रस्त्यालगत कचरा टाकणाऱ्या नागरिकांनाही त्यांनी आवाहन केले. कचरा रस्त्याच्या कडेला न टाकता प्रशासनाच्या कचरा संकलन वाहनातच टाकावा. वारंवार सूचना देऊनही रस्त्यालगत कचरा टाकला जात असल्यास संबंधितांवर तातडीने कारवाई करावी, अशा स्पष्ट सूचना त्यांनी स्थानिक प्रशासनाला दिल्या.

नवरात्रोत्सवासाठी बुऱ्हानगरकडे येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता रस्ते, स्वच्छता आणि वाहतूक व्यवस्थेकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. त्यामुळे उत्सवापूर्वीच रस्त्यांवरील खड्डे आणि अस्वच्छतेचा प्रश्न मार्गी लावण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

follow us