कोपरगाव मतदार संघातील नवीन ट्रान्सफॉर्मर बसविणे, विज वाहिन्या स्थलांतरणासाठी पाऊण कोटी- आ. आशुतोष काळे
Kopargaon News: कोपरगाव विधानसभा मतदार संघातील (Kopargaon Assembly) ओव्हरलोड ट्रान्सफॉर्मर बदलणे, काही ठिकाणी नवीन ट्रान्सफॉर्मर बसविणे तसेच वीज वाहिन्या, पोल व ट्रान्सफॉर्मर (Transformer) स्थलांतरीत करण्यासाठी जवळपास पाऊन कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे, (Kopargaon News) अशी माहिती आमदार आशुतोष काळे (Ashutosh Kale) यांनी दिली आहे. मतदार संघातील विकास कामांबरोबरच विजेच्या बाबतीत असलेल्या समस्या आमदार आशुतोष काळे यांनी सोडविल्या आहेत.
गावागावांतील नागरिक व शेतकऱ्यांच्या विजेच्या समस्या दूर करण्यासाठी अनेक गावांतील ओव्हर लोड ट्रान्सफॉर्मरची समस्या दूर करून कमी दाबाने होणारा वीजपुरवठा त्यामुळे वारंवार ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त होणे या समस्या सोडविण्यासाठी यापूर्वी जवळपास पावणे दोन कोटी निधी देवून या समस्या दूर केल्या आहेत त्यामुळे शेतकरी व नागरिकांच्या बहुतांश प्रमाणात विजेच्या समस्या दूर झाल्या आहेत. तरीदेखील ज्या ठिकाणी नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्याची आवश्यकता आहे. ज्या वीज वाहिन्या स्थलांतरीत करायच्या होत्या. त्यासाठी निधी मिळावा याबाबत आशुतोष काळे यांचा पाठपुरावा सुरु होता. त्या पाठपुराव्याची दखल घेवून जिल्हा नियोजन समितीमधून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीला या कामासाठी 76.32 लक्ष निधी देण्यात येणार आहे.
कोपरगावात “जागर स्त्री शक्तीचा” नवरात्रौत्सव; प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाचा उपक्रम
या निधीतून मतदार संघातील कारवाडी येथील ताम्हाणे डी.पी.येथे नवीन 63 के.व्ही. ट्रान्सफॉर्मर बसविणे, दहेगाव बोलका येथील पाणी पुरवठा ट्रान्सफॉर्मर शिफ्टिंग करणे, ब्राम्हणगाव येथील वाकचौरे डी.पी येथे नवीन 63 के.व्ही. ट्रान्सफॉर्मर बसविणे, शिंगवे येथील जोशी वस्ती या ठिकाणी नवीन 100 के.व्ही. ट्रान्सफॉर्मर बसविणे, कोपरगाव बेट भागातील संत जनार्दन स्वामी मंदिर प्रवेशद्वाराजवळील ट्रान्सफॉर्मर स्थलांतरीत करणे, रवंदे येथील रामदास लामखडे यांच्या वस्तीवरील 11 के.व्ही.वीज वाहिनी स्थलांतरीत करणे.
तसेच अंजनापूर येथील माऊली डी.पी. येथे नवीन 63 के.व्ही. ट्रान्सफॉर्मर बसविणे, तीनचारी (कोकमठाण) येथील 11 के.व्ही.भन्साळी फिडर एच.टी.लाईन स्थलांतरीत करणे, पोहेगाव बु.येथील पिंपळादेवी ते वत्सल मॉडेल स्कूल पर्यंत स्ट्रीट लाईटचे 15 पोल टाकणे, रांजणगाव देशमुख खालकर मळा येथील डि.टी.सी. लाईन स्थलांतरीत करणे, दहेगाव बोलका समाज मंदिर येथील लाईन स्थलांतरीत करणे, धामोरी येथील नारायण मांजरे घराजवळील ट्रान्सफॉर्मर स्थलांतरीत करणे, धोत्रे वीरभद्र विद्यालय येथील लाईन स्थलांतरीत करणे, भोजडे गावातील सौ.सुशीलामाई काळे विद्यालय येथील लाईन स्थलांतरीत करणे आदी कामांचा समावेश आहे.
नागरिकांना येत असलेल्या विजेच्या समस्या सोडविण्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी पुढाकार घेवून हे काम मार्गी लावल्याबद्दल नागरिकांनी आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे. विजेच्या समस्या दूर करण्यासाठी पाऊन कोटी निधी दिल्याबद्दल आमदार आशुतोष काळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे आभार मानले आहे.