Download App

Swapnil Joshi: … आणि म्हणून मी प्रत्येक प्रमोशनसाठी जातोय, अभिनेत्याने व्यक्त केला आनंद

Swapnil Joshi On Naach g Ghuma: अभिनेता स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) हा अभिनेता म्हणून प्रेक्षकांच्या कायमच पसंतीस उतरला आहे.

Swapnil Joshi On Naach g Ghuma: अभिनेता स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) हा अभिनेता म्हणून प्रेक्षकांच्या कायमच पसंतीस उतरला आहे. नुकतच त्याचा वाळवी हा चित्रपट आला होता. परेश मोकाशींनीच या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. नुकतच एखादा चित्रपट घडण्यासाठी त्याचा मागे मोठी फौज असते आणि म्हणूनच एखादा चित्रपट यशस्वी होतो.

कलाकार, तंत्रज्ञ, गीतकार, मेकअप आर्टिस्ट आणि अनेक लोकांची मेहनत आणि त्यातून घडतो एखादा चित्रपट ! सध्या सोशल मीडियावर (social media) ‘नाच गं घुमा’ (Naach g Ghuma) चित्रपटाची जोरदार चर्चा होताना दिसतेय आणि अश्यातच कलाकारांच्या सोबतीने यात खारीचा वाटा आहे, तो म्हणजे अभिनेता – निर्माता स्वप्नील जोशी याचा स्वप्नीलचा निर्मिती म्हणून असलेला पहिला चित्रपट ‘नाच गं घुमा’ जोरदार चर्चेत आहे.

चित्रपटाचं प्रमोशन असो किंवा चित्रपटाच्या कोणत्याही कामात स्वप्नील कधीच मागे नव्हता. स्वप्नील सध्या त्याच्या विविध चित्रपटाच्या शूटमध्ये व्यस्त असून देखील “नाच गं घुमा”साठी तो आवर्जून प्रत्येक प्रमोशनमध्ये उपस्थित राहतोय. (Naach g Ghuma) या सगळ्याबद्दल बोलताना स्वप्नील म्हणतो की, निर्मिती करणं हे आव्हानाच काम होत पण ‘नाच गं घुमा’ सारख्या चित्रपटाची निर्मिती माझ्याकडून होणं हे खूप कमालीच आहे. मला प्रत्येक गोष्ट करताना वेगेवगळे अनुभव मिळतात आणि संपूर्ण टीम सोबत एक सुंदर बॉण्ड झाला आहे.

Box Office: अजय देवगणचा ‘मैदान’ चित्रपट फ्लॉप, 15 व्या दिवशी फक्त 38.55 कोटींचे कलेक्शन

आता चित्रपटासाठी खूप उत्सुकता आहे. चित्रपटाचं प्रमोशन जोरदार सुरू आहे प्रेक्षकांचं प्रेम कायम मिळतंय हे बघून अजून आनंद होतो आणि यातून अजून काम करण्याची प्रेरणा मिळतेय. माझ्या शूट मधून मला जेव्हा केव्हा वेळ मिळतोय तसा मी फिल्मच्या प्रमोशनसाठी जातोय, आगामी काळात स्वप्नील “बाई गं”, “जिलबी” सारख्या चित्रपटात वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. नाच गं घुमा प्रदर्शित होण्यासाठी अगदीच काही दिवस बाकी आहेत आणि सगळेच यासाठी उत्सुक आहेत.

follow us