Download App

‘नाच गं घुमा’ चित्रपटाला मिळणाऱ्या भरघोस प्रतिसादाबद्दल स्वप्नीलने मानले प्रेक्षकांचे आभार; म्हणाला…

Nach Ga Ghuma Movie: महाराष्ट्र दिनाच्या (Maharashtra Day) मुहूर्तावर "नाच गं घुमा" (Nach Ga Ghuma) संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला.

Nach Ga Ghuma Movie: महाराष्ट्र दिनाच्या (Maharashtra Day) मुहूर्तावर “नाच गं घुमा” (Nach Ga Ghuma) संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाने सगळ्यांची मन जिंकून घेतली. (Marathi Movie) चित्रपटाची क्रेझ चित्रपट प्रदर्शित होण्याआधी होतीच पण आता चित्रपट गृहात देखील याची क्रेझ बघायला मिळत आहे. स्वप्नीलची (Swapnil Joshi) निर्मिती असलेला हा पहिला वहिला चित्रपट आणि त्याने प्रेक्षकांना आपलंसं केलं यात सगळं काही आलंय यासाठी स्वप्नीलने सोशल मीडियावर (social media) खास पोस्ट लिहिली आहे.


स्वप्नील सांगितलं आहे की,” प्रेक्षकांची तुडूंब गर्दी, टाळ्या, शिट्या आणि प्रेक्षकांनी नाच गं घुमा ला दिलेलं मनापासून प्रेम मन भरून आलंय आणि एवढं प्रेम बघून खरंच खूप आनंद होतोय. हा घुमोत्सव असाच सुरू राहू दे, स्वप्नील हा कायम वैविध्यपूर्ण कामामुळे चर्चेत असतो आणि आणि त्याची निर्मिती असलेला हा पहिला वहिला चित्रपट हाऊसफुल्ल होतोय. आगामी काळात स्वप्नील पुन्हा अभिनेत्याच्या भूमिकेत दिसण्यासाठी सज्ज होत आहे. “नाच गं घुमा” नंतर स्वप्नील ” बाई गं ” आणि ” जिलबी ” सारख्या अनोख्या चित्रपटात भूमिका साकारणार आहे.

स्वप्नीलचा निर्मिती म्हणून असलेला हा पहिला वहिला चित्रपट आहे. याबद्दल स्वप्नीलने सांगितलं आहे की, बघता बघता आमचा चित्रपट तुमच्या भेटीला आला आहे. तुम्ही त्याला भरभरून प्रेम मिळत आहे, यात शंका नाही. निर्मिती करायचे दडपण होते पण प्रमोशन आणि सोशल मीडियावरून या चित्रपटाला तुम्ही जे प्रेम देताय ते बघून खूप आनंद होतोय. पुढे म्हणाला की, मला अभिनेता म्हणून जसं स्वीकारलं तसच एक निर्माता म्हणून देखील आपलंसं करून घेणार याची मला खात्री आहे.

भन्साळींचा मोठा खुलासा; Heeramandi मध्ये पाकिस्तानी स्टार्संसोबत दिसणार होत्या रेखा, करीना अन् राणी

यंदाच्या वर्षात अभिनेता स्वप्नील जोशी अजून एका भन्नाट स्त्रियांच्या सिनेमात दिसला आहे आणि तो म्हणजे बाई गं. याबद्दल लवकरच तो प्रेक्षकांना सांगणार असल्याचे माहिती मिळत आहे. ‘नाच गं घुमा’ नंतर आता बाई गं आणि जिलबी अश्या दर्जेदार सिनेमातून स्वप्नील प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे.

follow us

वेब स्टोरीज