भन्साळींचा मोठा खुलासा; Heeramandi मध्ये पाकिस्तानी स्टार्संसोबत दिसणार होत्या रेखा, करीना अन् राणी

भन्साळींचा मोठा खुलासा; Heeramandi मध्ये पाकिस्तानी स्टार्संसोबत दिसणार होत्या रेखा, करीना अन् राणी

Sanjay Leela Bhansali Reveal about Heeramandi : दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांची बहुचर्चित वेब सिरीज ‘हीरामंडी’ (Heeramandi ) बुधवारी 1 मे 2024 रोजी नेटफ्लिक्स (Netflix) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम करण्यात आली आहे. त्या दरम्यान दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी या सिरीजबाबत मोठा खुलासा केला आहे.

Student of the Year 3: अंकिता लोखंडे ‘स्टुडंट ऑफ द इयर 3’ चा भाग नसणार, चर्चांना उधाण

नुकताच बहुचर्चित वेब सिरीज ‘हीरामंडी’चा प्रीमियर अमेरिकेतील लॉस एन्जलिस येथे पार पडला. त्यावेळी भन्साळी यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यात त्यांनी या सिरीजबद्दल मोठा खुलासा केला. त्यांनी सांगितलं की, ते या सिरीजमध्ये पाकिस्तानी कलाकारांना घेणार होते. त्यामध्ये अभिनेता फवाद खान आणि माहिरा खान यांचा समावेश आहे.

चित्रा वाघांचं पॉर्न व्हिडिओचं ज्ञान अगाध, त्या पार्न फिल्म पाहत असतील; सुषमा अंधारेंचा पलटवार

तसेच त्यांनी यावेळी आणखी एक गोष्ट सांगितली ती म्हणजे त्यांना या सिरीजमध्ये एकेकाळी आपल्या नृत्य आणि अभिनयाने प्रेक्षकांना घायाळ करणाऱ्या अभिनेत्री रेखा, करीना कपूर आणि राणी मुखर्जी यांना देखील या सिरीजमध्ये घेण्यात येणार होते. मात्र ही अठरा वर्षांपूर्वीची गोष्ट होती. ज्यावेळी भन्साळी यांना या तीन दिग्गज अभिनेत्रींना एकत्र आणायचं होतं. त्यावेळी ही वेब सिरीज न बनवता चित्रपट बनणार होता. मात्र काळानुरूप यामध्ये बदल करण्यात आला.

दरम्यान आता या सिरीजमध्ये मल्टीस्टारर कथा आणि हीरामंडीचा आलिशान सेट प्रेक्षकांना प्रभावित करून गेले आहेत. तसेच यामध्य मनीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी, रिचा चढ्ढा, संजीदा शेख, शर्मीन सहगल, फरदीन खान हे कलाकार एकत्र पाहायला मिळाले आहेत. तर या वेब सीरिजमध्ये अदिती राव हैदरी (Aditi Rao Hydari) हिने ‘बिब्बोजन’ची भूमिका साकारली आहे. या मालिकेत तिला ही भूमिका कशी मिळाली याचा नुकताच अभिनेत्रीने खुलासा केला. एका सीनसाठी दिग्दर्शकाने तिला दिवसभर उपाशी राहण्यास सांगितले होते, असा खुलासाही आदितीने केला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज