Student of the Year 3: अंकिता लोखंडे ‘स्टुडंट ऑफ द इयर 3’ चा भाग नसणार, चर्चांना उधाण

Student of the Year 3: अंकिता लोखंडे ‘स्टुडंट ऑफ द इयर 3’ चा भाग नसणार, चर्चांना उधाण

Ankita Lokhande On Student of the Year 3: करण जोहरच्या (Karan Johar) ‘स्टुडंट ऑफ द इयर’ मधून आलिया भट, वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा सिनेसृष्टीत आले आणि रातोरात स्टार झाले आहेत. यानंतर सिनेमाचा सिक्वेल देखील आला. यामध्ये टायगर श्रॉफबरोबर अनन्या पांडे (Ananya Pandey) आणि तारा सुतारिया यांची मुख्य भूमिका होती. आता तिसऱ्या भागात करण जोहर कोणाला लाँच करणार अशी चर्चा सुरु असतानाच याविषयी वेगळीच माहिती समोर आली आहे.

‘स्टुडंट ऑफ द इयर 3’ (Student Of The Year 3) हा सिनेमा नाही तर वेबसीरिज असणार आहे. सध्या ओटीटीची सर्वत्र चर्चा आहे. अनेक वेबसीरिज रिलीज होत आहे. मोठमोठे कलाकार देखील आता ओटीटीकडे वळले आहेत. करण जोहरने 12 वर्षांअगोदर ‘स्टुडंट ऑफ द इयर’ सिनेमा आणला होता. सिनेमाला खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. नंतर दुसरा पार्टही आला. तर आता तिसऱ्या पार्टविषयी करण जोहरने अपडेट दिली होती.

यावेळी हा सिनेमा नाही तर वेबसीरिज असणार अशी माहिती दिली होती. तर या वेबसीरिजमध्ये अंकिता लोखंडेला (Ankita Lokhande) महत्त्वाच्या भूमिकेसाठी काम करणार असल्याचा चर्चांना उधाण असताना आता ही अफवा असून अस काही नसल्याचं समोर आल आहे. इंटरनेटवर अनेक चर्चा होत असताना अंकिता यात काम करणार असल्याची माहिती मिळाली आहे. अभिनेत्रीच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले की, हे अहवाल खोटे आहेत आणि अभिनेत्री कधीही त्याचा भाग नव्हती अशी माहिती सध्या समोर आली आहे.

Film Festival: आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गीतांजली कुलकर्णीच्या ‘या’ सिनेमाची बाजी

दरम्यान वर्क फ्रंटवर अंकिता रणदीप हुडा दिग्दर्शित ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ मध्ये ‘यमुनाबाई’ची भूमिका साकारताना दिसली. या अभिनेत्रीने ऐतिहासिक चित्रपटात दमदार कामगिरी केली आणि पात्र चित्रणासाठी खूप प्रशंसा मिळाली. चित्रपटाच्या यशानंतर तिने पहिल्यांदा पती विकी जैनसोबत ‘ला पिला दे शराब’ गाण्यासाठी काम केले. अंकिता सध्या रोलवर आहे, कारण ती संदीप सिंगच्या मॅग्नम ओपस मालिका ‘आम्रपाली’ मध्ये शाही गणिकेची भूमिका साकारण्याच्या तयारीत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज