Chunkey Panday: अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांच्यातील नातेसंबंधावर अभिनेत्याने सोडलं मौन

Chunkey Panday: अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांच्यातील नातेसंबंधावर अभिनेत्याने सोडलं मौन

Chunkey Panday Reacts Ananya Panday Relationship: अभिनेता चंकी पांडे (Chunkey Panday) अनेक दिवसांपासून आपल्या चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. गेल्या काही वर्षांपासून बॉलीवूड (Bollywood) चित्रपटांमध्ये कॉमेडीची चव जोडणाऱ्या चंकी पांडेने करिअरच्या सुरुवातीला ‘हिरो’ म्हणून काम केले होते. आता चंकी पांडेप्रमाणेच त्याची मोठी लेक अनन्या पांडेही (Ananya Pandey) चित्रपटांमध्ये धुमाकूळ घालताना दिसत आहे.

मात्र, गेल्या काही काळापासून अनन्या पांडे तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत आहे. अनन्या पांडे अभिनेता आदित्य रॉय कपूरला (Aditya Roy Kapur) डेट करत आहे. काही दिवसांपूर्वी अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर त्यांच्या रोमँटिक व्हेकेशनवर स्पॉट झाले होते. अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांनी अद्याप त्यांच्या नात्याबद्दल खुलासा केले नसले तरी, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत चंकी पांडेने त्यांच्या नात्यावर मौन सोडले आहे.

चंकी पांडेलाही अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांच्या नात्याबद्दल विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला की, माझी मुलगी तिला जे करायचे ते करू शकते. आणि यासाठी मी तिला पूर्ण परवानगी दिली आहे. ती आता 25 वर्षांची आहे. आणि ती माझ्यापेक्षा जास्त पैसे कमावते. आता मी माझ्या 25 वर्षाच्या मुलीला हे सांगण्याची हिंमत कशी करू शकतो की तू हे किंवा ते करू नकोस.

Kasumbo Trailer: गुजराती ‘कसूमबो’ हिंदीत होणार रिलीज, सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

मुलीच्या बोल्ड सीन्सबद्दलही बोलले

यादरम्यान चंकी पांडेने अनन्या पांडेने दिलेल्या बोल्ड सीनबद्दलही सांगितले आहे. ‘गेहराईं’ चित्रपटात अनन्याचे अनेक इंटिमेट सीन्स होते. याबाबत बोलताना चंकी पांडे म्हणाला की, मला यात काही चुकीचे दिसत नाही. हे सर्व हॉलिवूडमध्येही पाहायला मिळाले आहे. आणि त्यात काहीही नुकसान नाही. जरी आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे यांनी त्यांच्या नात्याबद्दल मीडियासमोर काहीही बोलले नाही. पण ‘कॉफी विथ करण’ सीझन 8 मध्ये दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल जे काही बोलले त्यावरून ते दोघे एकमेकांना डेट करत असल्याचे निश्चित झाले. नुकतेच गुजरातमधील भावनगर येथे झालेल्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग पार्टीमध्ये दोघेही एकत्र स्पॉट झाले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज