Download App

तारक मेहताच्या चाहत्यांना धक्का! ‘दयाबेन’ दिशाची वापसी अशक्य; असित मोदींनी कारणही सांगितलं

TMKOC : मागील बारा वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारी मालिका तारक मेहता का उलटा चष्मा. या मालिकेतील पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं. मालिकेतील अनेक पात्र अजूनही आहेत तर काहींनी मात्र विविध कारणांमुळे मालिका सोडली. यातीलच एक अतिशय गाजलेलं पात्र दयाबेन. या पात्राची भूमिका करणारी अभिनेत्री दिशा वाकानी अनेक (Disha Vakani) दिवसांपासून या शो मध्ये नाही. आता या मालिकेच्या चाहत्यांना धक्का देणारी बातमी आली आहे. दिशा वाकानी अर्थात तारक मेहतामधील दयाबेन पुन्हा या मालिकेत येणार नाही हे जवळपास निश्चित झालं आहे.

दिशा वाकानीने 2018 मध्येच हा शो सोडला होता. यानंतर ती पुन्हा मालिकेत दिसलीच नाही. निर्माते मात्र दिशाला परत आणण्यासाठी प्रयत्न करत होते. परंतु, त्यांचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले आहेत. मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना हा खुलासा केला. असित मोदी म्हणाले, दिशा या शो चा एक अभिन्न हिस्सा होती. तिला पुन्हा या मालिकेत घेऊन येण्याची आमची इच्छा होती. परंतु, बदलत्या परिस्थितीमुळे यात तिच्याकडून विलंब होत गेला.

सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर पहिल्यांदाच एकत्र! ‘फसक्लास दाभाडे’मधील ‘दिस सरले’ गाणं प्रदर्शित

दयाबेन परतणं अवघडच

असित म्हणाले, दयाबेनला पुन्हा आणणं गरजेचं आहे मलाही आता त्यांची आठवण येत आह. कधी कधी परिस्थिती वेगळी असते त्यामुळे उशीर होतो. कधी कधी कथाही जास्त लांबते तर कधी मोठ्या घटना घडतात. 2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुका होत्या. नंतर आयपीएल, पुढे विश्वकप, नंतर पाऊस अशा कारणांमुळे उशीर होत गेला.

दयाबेन कधी येणार?

याच मुलाखतीत असित मोदी यांनी दयाबेनच्या वापसीवर चर्चा केली आणि सांगितलं की दिशा वाकानी शोमध्ये परत वापसी करेल असे सध्या तरी दिसत नाही. मी अजूनही प्रयत्न करत आहे. मला असं वाटतं की दिशा आता पुन्हा मालिकेत येणार नाही. त्यांना दोन मुलं आहेत. अशा परिस्थितीत तिच्यासाठी मालिकेत पुन्हा एन्ट्री करणं कठीणच आहे. लग्नानंतर महिलांचं जीवन बदलून जातं.

लहान मुलं आणि घराची जबाबदारी सांभाळणं त्यांच्यासाठी कठीण होऊन जातं. परंतु, तरीही मी सकारात्मक आहे. मला अजूनही वाटतं की काही ना काही तरी चमत्कार घडू शकतो. दिशा वाकानी पुन्हा मालिकेत आली तर आनंदाचीच गोष्ट आहे. पण, जर असं घडलं नाही तर आम्हाला दयाबेनच्या भूमिकेसाठी दुसऱ्या पात्राचा शोध घेण्याशिवाय पर्याय नाही.

‘तारक मेहता’मधील भिडे मास्तरांच्या लेकीनं बांधली लग्नगाठ.. व्हिडिओ नक्की पाहा!

follow us