‘तारक मेहता’मधील भिडे मास्तरांच्या लेकीनं बांधली लग्नगाठ.. व्हिडिओ नक्की पाहा!
Jheel Mehta : मागील बारा वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारी मालिका तारक मेहता का उलटा चष्मा. या मालिकेतील पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं. मालिकेतील अनेक पात्र अजूनही आहेत तर काहींनी मात्र विविध कारणांमुळे मालिका सोडली. यातीलच एक झील मेहता. या मालिकेत अभिनेत्री झीलने आत्माराम भिडेच्या मुलीची (सोनू) भूमिका साकारली होती. आता याच सोनूबाबत मोठी अपडेट मिळाली आहे. झील मेहता नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. बॉयफ्रेंड आदित्य दुबेशी तिने लग्नगाठ बांधली आहे. या विवाह सोहळ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यावर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे.
आत्माराम तुकाराम भिडे तारक मेहता का उलटा चष्मा सोडणार? अभिनेत्याने सांगितलं कारण, म्हणाला..
View this post on Instagram
झील मेहताने या लग्नाचा एक व्हिडिओ इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. यामध्ये ती लाल रंगाच्या साडीत खूपच सुंदर दिसत आहे. तिचा बॉयफ्रेंड आदित्य दुबेच्या चेहऱ्यावरही आनंद आणि त्यासोबतच भावूकताही दिसत आहे. काही वेळ त्याच्या डोळ्यांतून अश्रुही वाहिले. नेमक्या याच वेळी झीलने त्याच्या डोळ्यांतील अश्रू पुसले. हा खास प्रसंग चांगलाच व्हायरल होत आहे.
झील मेहताने 28 डिसेंबर रोजी हिंदू धर्म रितीरिवाजांनुसार आदित्य दुबेशी लग्न केलं. या लग्नाच्या तीन दिवसानंतर झीलने लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडिओत तिच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत आहे. तर आदित्यच्या चेहऱ्यावर भावनांचा कल्लोळ दाटलाय. विवाहाच्या खास प्रसंगी वधू वरांनी एकमेकांच्या गळ्यात पुष्पहार घातले त्यानंतर अग्नीच्या साक्षीने सप्तपदी घेत जीवनभर एकमेकांना साथ देण्याच्या आणाभाका घेतल्या.