Tamannaah Bhatia, Diana Penty will toghether in Prime Videos Series Do You Wanna Partner : गेल्या कित्येक दिवसांपासून चित्रपटसृष्टीपासून दूर असलेली अभिनेत्री डायना पेंटी आणि तमन्ना भाटिया ही आघाडीची अभिनेत्री लवकरच एका सिरीजमध्ये एकत्र पाहायला मिळणार आहे. भारताचा अग्रगण्य मनोरंजन प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडीओने आपल्या नवीन सिरीजची अधिकृत घोषणा केली आहे.
‘आपला मावळा संघटने’ची सहावी दुर्गसंवर्धन मोहीम! निलेश लंके यांची प्रतापगडावर हाक
भारताचा अग्रगण्य मनोरंजन प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडीओने आपल्या नवीन ओरिजिनल कॉमेडी-ड्रामा सिरीज ‘डू यू वाना पार्टनर’ चा प्रीमियर १२ सप्टेंबर २०२५ रोजी होणार असल्याची अधिकृत घोषणा केली आहे. धर्मटिक एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली तयार झालेली ही सिरीज करण जोहर, आदर पुनावाला आणि अपूर्व मेहता यांनी निर्मिती केली आहे. शोमेन मिश्रा आणि अर्चित कुमार एक्झिक्युटिव्ह प्रोड्यूसर्स आहेत. दिग्दर्शनाची जबाबदारी कॉलिन डी’कुन्हा आणि अर्चित कुमार यांनी सांभाळली आहे. या सिरीजची कथा नंदिनी गुप्ता, अर्श वोरा आणि मिथुन गंगोपाध्याय यांनी लिहिली असून, गंगोपाध्याय आणि निशांत नायक यांची ही संकल्पना आहे.
तमन्ना भाटिया आणि डायना पेंटी या दोघी मुख्य भूमिकांमध्ये दिसणार असून, त्यांच्या जोडीला जावेद जाफरी, नकुल मेहता, श्वेता तिवारी, नीरज काबी, सूफी मोतीवाला आणि रणविजय सिंह यांच्यासारखे लोकप्रिय कलाकार सिरीजमध्ये महत्त्वाची पात्रं साकारतील. ‘डू यू वाना पार्टनर’ १२ सप्टेंबरपासून भारतासह जगभरातील २४० हून अधिक देश आणि प्रदेशांमध्ये फक्त प्राइम व्हिडीओवर स्ट्रीम केली जाईल.
सिरीजची कहाणी :‘डू यू वाना पार्टनर’ ही एक भन्नाट आणि आधुनिक काळातील कॉमेडी-ड्रामा आहे, ज्यामध्ये शिखा आणि अनाहिता (तमन्ना आणि डायना यांच्या भूमिका) या दोन जिवलग मैत्रिणींची गोष्ट सांगितली आहे. त्या दोघी महिलांसाठी अत्यंत अपरिचित असलेल्या क्राफ्ट बीयरच्या पुरुषप्रधान जगात स्वतःचं अल्कोहोल स्टार्टअप सुरू करण्यासाठी एक धाडसी पाऊल उचलतात.
मद्यव्यवसायात राजकीय मेजवानी! 328 परवाने भाजप अन् राष्ट्रवादी नेत्यांच्या निकटवर्तीयांच्या खिशात
शहरी जीवनाच्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर, ही सिरीज मैत्री, स्वप्नपूर्ती, स्त्री सशक्तीकरण आणि सामाजिक रूढींच्या विरोधात उभं राहत आपली जागा निर्माण करणाऱ्या स्त्रियांचा प्रवास दाखवते. जुगाड, जज्बा आणि स्टाईलच्या जोरावर त्या आपली वेगळी वाट निर्माण करतात. ‘डू यू वाना पार्टनर’ ही सिरीज आधुनिक भारतातल्या स्त्रियांच्या उद्योजकीय प्रवासाला विनोदी आणि प्रेरणादायी रूपात मांडते, आणि १२ सप्टेंबरपासून ती जगभरातील प्रेक्षकांसाठी फक्त प्राइम व्हिडीओवर उपलब्ध होणार आहे.