Download App

Tamanna Bhatia: बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीकडून राशीचं तोंडभरून कौतुक; म्हणाली, ‘खूप हॉट…’

Tamanna Bhatia On Rashi Khanna Look: बॉलिवूड (Bollywood) आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamanna Bhatia) ही तिच्या अनोख्या स्टाईलनं आणि अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. तमन्ना ही लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर (social media) कायम होत असते. तमन्नाकडून आता राशीच्या लूकच (Raashi Khanna) तोंडभरून कौतुक करताना पाहायला मिळाली आहे.

‘अरनमानाई 4’ ची सहकलाकार राशि खन्ना हीच सर्वत्र कौतुक होत असताना तमन्ना आणि राशी दोघी यातील एका गाण्यात दिसणार आहे. अलीकडेच या दोघीं चित्रपटातील ‘अच्छा’ या गाण्यात सोबत दिसल्याने सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे. राशीच्या लूकबद्दल बोलताना तमन्ना एका मुलाखतीत म्हणाली की, “राशी या चित्रपटात सुपर हॉट दिसत आहे. किमान त्या गाण्यात ती सुपर हॉट आहे. तिचा लूक खूपच स्टनिंग आहे, ती सुपर टोन्ड आहे.

राशीनेही तमन्नाचे तिच्या अभिनयाचं कौतुक केलं असून “आम्ही एकमेकींकडून खूप काही शिकतोय, असे अभिनेत्री यावेळी म्हणाली. चाहते त्यांना ‘अरनमानाई 4’ मध्ये पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी तयारी करत असताना, ‘अच्छाचो’ या गाण्याने चित्रपटसृष्टीत नक्कीच हॉटनेस वाढवला आहे.

Pushpa2: ‘पुष्पा 2’ने रचला इतिहास! बॉक्स ऑफिसवर रिलीजपूर्वीच 1000 कोटींचा व्यवसाय

वर्कफ्रंटवर ‘अरनमानाई 4′ व्यतिरिक्त, तमन्ना जॉन अब्राहम- स्टार ‘वेद’, करण जोहरचा प्रोडक्शन व्हेंचर ‘डेअरिंग पार्टनर्स’, तेलुगू चित्रपट ‘ओडेला 2’ आणि नीरज पांडेच्या अनटाइटल्ड प्रोजेक्टची वाट पाहत आहे. दुसरीकडे, राशीकडे तिच्या किटीमध्ये काही मनोरंजक प्रकल्प आहेत. ती ‘द साबरमती रिपोर्ट’च्या रिलीजची तयारी करत आहे आणि तिच्याकडे हिंदी चित्रपट ‘TME’ आणि तेलुगु चित्रपट ‘तेलुसू काडा’ आहे.

 

follow us

वेब स्टोरीज