Download App

Apurva Song: ‘अपूर्वा’ सिनेमातील पहिलं गाणं रिलीज; तारा सुतारियाचा चित्रपट ‘या’ दिवशी येणार भेटीला

Apurva Movie Song Release Out : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री तारा सुतारिया (Tara Sutaria) ही तिच्या चित्रपटांमुळे जोरदार चर्चेत असते. चित्रपट निर्माता करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’ या सिनेमातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या ताराने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. ताराचा ‘अपूर्वा’ (Apurva Movie ) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिच्या या चित्रपटाचा पहिल गाणं रिलीज करण्यात आला आहे. (Social Media) या गाण्यामधील ताराच्या अभिनयाचं सध्या अनेकजण तोंडभरून कौतुक करत आहेत.


तारा सुतारिया ही ‘अपूर्वा’ या थ्रिलर चित्रपटाद्वारे ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. ‘अपूर्व’ या चित्रपटातील पहिल गाणं नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. Disney Plus Hotstar या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या YouTube चॅनेलवर ‘अपूर्व’ चित्रपटाचा ट्रेलर शेअर करण्यात आला आहे. गाण्यात दाखवण्यात आलं आहे की, अपूर्वा नावाच्या तरुणीचे लग्न सिद्धार्थ नावाच्या मुलाशी होणार आहे. अपूर्वा आणि सिद्धार्थ यांच्या लग्नाची तयारी सुरु असते अशातच काही गुंड अपूर्वाचे अपहरण करतात. या गुंडांच्या तावडीतून आपला जीव वाचवण्यासाठी अपूर्वा धडपड करते.

‘अपूर्वा’ कधी होणार रिलीज?

‘अपूर्वा’ या सिनेमा तारा सुतारियासोबतच अभिषेक बॅनर्जी, राजपाल यादव आणि धैर्य करवा या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. ‘अपूर्वा’ हा सिनेमा 15 नोव्हेंबर दिवशी रिलीज होणार आहे. हा चित्रपट Disney Plus Hotstar या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. काही दिवसांपूर्वी ‘अपूर्वा’ या चित्रपटाचा टीझर देखील रिलीज झाला होता. या टीझरला देखील नेटकऱ्यांची पसंती मिळाली होती.

Pashan : ‘पाषाण’ लघुपटाला सर्वोत्कृष्ट मराठी लघुपटाचा मान…

तारा सुतारियाचा गेल्या वर्षी ‘एक व्हिलन रिटर्न्स’ हा सिनेमा रिलीज झाला होता. जॉन अब्राहम, अर्जुन कपूर, आणि दिशा पाटनी यांनी देखील या सिनेमात मुख्य भूमिका साकारली होती. या सिनेमानंतर तारा सुतारियाच्या आगामी सिनेमाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. तारा सुतारिया ही सोशल मीडियावर देखील अॅक्टिव असते. इन्स्टाग्रामवर तिचे 8.8 मिलियन फॉलोवर्स आहेत.

Tags

follow us