Download App

TDM Review : गावातील राजकारण, घरातली बेताची परिस्थिती; नवोदीत कलाकारांनी वेधलं लक्ष

TDM Review: ‘टीडीएम’ची (TDM) गोष्ट ही गावातल्या मातीची आणि त्या मातीत राबणाऱ्या माणसांची आहे. गावातल्या जगण्याची अनुभूती हा चित्रपट देतो. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे (Director Bhaurao Karhade) दिग्दर्शित या चित्रपटात पृथ्वीराज थोरात (Prithviraj Thorat) आणि कालिंदी निस्ताने (Kalindi Nistane) हे नवोदित कलाकार मुख्य भूमिका साकारत आहेत. भाऊराव कऱ्हाडे यांची मातीतला चित्रपट बनवण्याची ओळख आहे. बबन आणि ख्वाडा या त्यांच्या चित्रपटातून ते जाणवल आहे. असाच अनुभव ‘टीडीएम’ चित्रपट देखील देत आहे.

बाबू आणि निलम यांची प्रेमकहाणी हा या चित्रपटाचा मूळ विषय नाही. तर यासोबतच रोजगार निर्मिती, राजकारण, कौटुंबिक जबाबदाऱ्या या सगळ्या गोष्टींवरही हा चित्रपट भाष्य करतो. शिक्षणाच्या वाटेतून बाहेर पडलेली तरुण पिढी, गावाकडचं आयुष्य या सगळ्यात गावाकडची तरुण मंडळींना येणाऱ्या अडचणी या चित्रपटातून ठळकपणे दाखवण्यात आले आहे. गावातील आयुष्यातला खरेपणा भाऊराव कऱ्हाडेंनी रुपेडी पडद्यावर जिवंत केल आहे.

TDM म्हणजे नक्की काय हे गावाकडच्या लोकांना माहिती असते. मात्र ज्यांना याचा अर्थ जाणून घ्यायचाय त्यांनी हा चित्रपट पाहुन तो अर्थ समजून घ्यायला हवा. या चित्रपटाच ट्रॅक्टरचा उल्लेख फार महत्वाचा आहे. चित्रपटाच्या गाण्यांमध्ये, विविध सीनमध्ये ट्रॅक्टर अधोरेखित करण्यात आला आहे. तो कसा? आणि का? आहे हे चित्रपटातून समोर येतं आहे.

चित्रपटातील गाणी देखील रंजक आहेत. मात्र त्याचं चित्रीकरण आणि कलाकारांच्या अभिनयाचा कस लागला असता तर ती आणखी खुलली असती असं जाणवतं. पृथ्वीराज आणि कालिंदी हे नवखे कलाकार जरी असले तरी त्यांनी भूमिकांमधील सहजपणा कायम ठेवत त्यातील खरेपणा सादर केला आहे. त्यामुळे ती गावातली तरुणाईचं दर्शन घडवतात. गावातील वास्तव या कलाकारांच्या भूमिकेतून उत्तम पद्धतीने सादर होतो. तरी अभिनयाचा कस आणखी लागला असता तर त्यांच्या भूमिका आणखी खुलून दिसल्या असत्या असं जाणवतं आहे.

Kajol : ‘आयुष्यातील कठीण टप्प्यातून जात आहे’ म्हणत काजोलनं उचललं मोठं पाऊल !

रेडिओवर गाणी ऐकत ट्रॅक्टरवर गावभर हिंडणारा बाबू हा उनाड आहे. बावडी खोदणं, रेती ट्रॅक्टरने वाहणं हे त्यांच रोजचं काम. गावातील निलम नावाच्या मुलीवर बाबूचा जीव जडल जाते. या सगळ्यात गावातील राजकारण, घरातली बेताची परिस्थिती यावर बाबू कसा मात करतो ? निलमसोबतचं त्याचं नातं कसं पुढे जातं ? या सगळ्या गोष्टी या चित्रपटात विविध वळण घेऊन येतात. चित्रपटाचं छायांकन जमेची बाजू आहे. मात्र त्यातही बराचसा वाव होता असं जाणवतं. चित्रपटाची गाणी आणि पार्श्वसंगीत कथेला न्याय देणारं आहे. गावातल्या लोकांचं रोजचं जगणं हा चित्रपट सादर करतो. या जगण्याचा अनुभव घ्यायचा असेल तर TDM हा चित्रपट नक्की पाहा.

Tags

follow us