Download App

प्रेक्षकांची प्रतिक्षा संपली; दिपक राणे फिल्म्स निर्मित ‘आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे’ चा टीझर प्रदर्शित

Operation London Cafe Teaser: रमेश कोठारी निर्मित 'आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे' या बहुप्रतीक्षित सिनेमाचा धमाकेदार टीझर नुकताच रिलीज झाला.

Operation London Cafe Teaser: गेल्या काही महिन्यांपूर्वी ‘आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे’ (Operation London Cafe ) या मराठी सिनेमाच्या पोस्टरने चाहत्यांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण केली होती. (Marathi Movie) या सिनेमाचा लूक पाहून मराठी प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय बनला होता (Operation London Cafe Teaser) की हा सिनेमा कधी प्रदर्शित होणार? (Social media) विशेष म्हणजे, मराठी आणि कन्नडा सिनेमाचं कोलॅबोरेशन म्हणजे ‘आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे’ हा सिनेमा.

दिपक पांडुरंग राणे, विजय कुमार शेट्टी हवाराल, आणि रमेश कोठारी निर्मित ‘आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे’ या बहुप्रतीक्षित सिनेमाचा धमाकेदार टीझर नुकताच रिलीज झाला आहे. त्यामध्ये दाखवलेल्या सीन्सनी, कलाकारांच्या अभिनयाच्या झलक, थरारक ऍक्शन सिक्वेन्सेसनी आणि प्रभावी बॅकग्राऊंड म्युझिकमुळे प्रेक्षकांच्या अपेक्षा आणखी वाढल्या आहेत. हा सिनेमा काहीतरी अनोखा आणि अधिक रोमांचक असल्याची चर्चा देखील आहे. मराठी सिनेसृष्टीने आजवर अनेक वेगवेगळे विषयावर सखोल विचार करून हाताळले आहेत, परंतु हा सिनेमा एका नव्या दृष्टिकोनातून आणि अनोख्या शैलीतून सादर करण्यात आला आहे.

‘आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे’ या सिनेमाचे निर्माते दिपक पांडुरंग राणे हे विविध जॉनरमधील सिनेमांची निर्मिती करत प्रेक्षकांना एक अनोखा अनुभव देण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहेत. त्यांचा नेहमीच असा उद्देश असतो की प्रेक्षकांनी अडीच ते तीन तास सिनेमागृहात येऊन स्वतःसाठी वेळ काढावा, रिलॅक्स व्हावे आणि मनोरंजनाचा आनंद घ्यावा. त्यामुळे त्यांनी अनोख्या अशा सिनेमांची निवड केली आहे, जे प्रेक्षकांना आवडणार आहेत. आता त्यांनी एक नवं पाऊल पुढे टाकत एक नवीन विषय हाताळला आहे. यावेळी त्यांनी मराठी सिनेसृष्टीसाठी एक असा सिनेमा तयार केला आहे, जो कन्नडा सिनेमासोबत कोलॅबोरेट करून बनवला गेला आहे. हा सिनेमा कन्नडा, मराठी, हिंदी, तेलुगु, तामिळ आणि मल्याळम या 6 भाषांमध्ये पॅन इंडिया प्रदर्शित होणार आहे.

Raavrambha Marathi Movie : मराठी रुपेरी पडद्यावर ‘रावरंभा’ चित्रपटाचा दिमाखदार संगीत अनावरण सोहळा

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील दिग्दर्शक सदागारा राघवेंद्र यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे’ या सिनेमात मराठीतील दिग्गज आणि लोकप्रिय कलाकार शिवानी सुर्वे, विराट मडके, प्रसाद खांडेकर, अश्विनी चावरे, शलाका पवार यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. याचबरोबर, साऊथ इंडस्ट्रीतील सुपरस्टार कवीश शेट्टी आणि लोकप्रिय अभिनेत्री मेघा शेट्टी देखील प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. मराठी आणि साऊथ इंडस्ट्रीतील प्रतिभावंत कलाकार एकाच सिनेमात एकत्र येऊन ज्या ताकदीने हे पात्र साकारणार आहेत, ते प्रेक्षकांसाठी एक परिपूर्ण मनोरंजनाचा खजिना ठरणार आहे.

follow us