‘हनुमान अंश’चा टीझर प्रदर्शित, नीम करौरी बाबा यांच्या जीवनावर आणि संदेशावर आधारित भावस्पर्शी चित्रपट

स्वयंभू मीडिया नेटवर्क प्रस्तुत ‘हनुमान अंश’ हा चित्रपट श्री नीम करौरी बाबा यांच्या जीवनातून आणि त्यांच्या शिकवणीतून प्रेरित आहे.

Untitled Design (20)

Untitled Design (20)

Teaser of ‘Hanuman Ansh’ released : श्री नीम करौरी बाबा यांच्या प्रेरणादायी जीवनकथेवर आधारित ‘हनुमान अंश’ हा चित्रपट 31 जुलै 2026 रोजी देशभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. स्वयंभू मीडिया नेटवर्क प्रस्तुत ‘हनुमान अंश’ हा चित्रपट श्री नीम करौरी बाबा यांच्या जीवनातून आणि त्यांच्या शिकवणीतून प्रेरित आहे. हा चित्रपट 31 जुलै 2026 रोजी संपूर्ण भारतातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन विशाल चतुर्वेदी यांनी केले आहे. चित्रपटात शोभिना डब्ल्यू सत्या, विहान एस हेगडे, चंदन आनंद, पूर्णिमा तिवारी, अनिल के. रस्तोगी आणि गुलशन पांडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

रागिनी एस., नम्रता जी. सिंह, अनुप्रिया ए. नागर आणि विशाल चतुर्वेदी यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. देशभरातील प्रदर्शनाची जबाबदारी सिनेपोलिसकडे आहे. ‘हनुमान अंश’ ही श्रद्धा, सेवा, प्रेम आणि साधेपणाची कथा आहे. भारतीय संतपरंपरेचा गौरव मोठ्या पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे. श्री नीम करौरी बाबा यांच्या जीवनातील प्रेरणादायी पैलू आणि त्यांच्या शिकवणीचा प्रभावी संदेश यातून उलगडला जातो. त्यांचा संदेश होता – “सर्वांवर प्रेम करा, सर्वांची सेवा करा, सर्वांना अन्न द्या आणि रामाचे स्मरण करा.”

श्री नीम करौरी बाबा यांचा प्रभाव केवळ भारतापुरता मर्यादित राहिला नाही. जगभरातील अनेक उद्योगपती, कलाकार, खेळाडू आणि लाखो भक्त त्यांच्या विचारांनी प्रेरित झाले आहेत. स्टीव्ह जॉब्स, मार्क झुकरबर्ग, ज्युलिया रॉबर्ट्स, विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांसारख्या अनेक प्रसिद्ध व्यक्तींवर त्यांच्या आध्यात्मिक विचारांचा प्रभाव राहिल्याचे सांगितले जाते. स्टीव्ह जॉब्स यांची कैंची धाम भेट, मार्क झुकरबर्ग यांचा आश्रम दौरा, ज्युलिया रॉबर्ट्स यांना बाबा यांच्या छायाचित्रातून मिळालेली प्रेरणा तसेच विराट-अनुष्का यांची आश्रम भेट यांची चर्चा यापूर्वीही झाली आहे.

पार्थ पवार आणि कायनात धर यांचा 29 जुलैला साखरपुडा, जाणून घ्या पवार कुटुंबियांची होणारी सून कोण?

गेल्या काही वर्षांत धर्म, भक्ती आणि भारतीय संस्कृतीवर आधारित चित्रपटांना प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. ‘लालो’, ‘कृष्णावर्तम’, ‘हनु-मान’ आणि ‘महावतार नरसिंह’ यांसारख्या चित्रपटांच्या यशाने हे सिद्ध झाले आहे. त्याच परंपरेत ‘हनुमान अंश’ हा चित्रपटही अशी कथा घेऊन येत आहे, जी प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करण्याबरोबरच त्यांना आध्यात्मिक अनुभव देण्याचा प्रयत्न करते. हा चित्रपट केवळ एका संताचे चरित्र नाही, तर भक्ती, सेवा, श्रद्धा आणि समर्पणाचा प्रवास आहे. बाबा यांच्या भक्तांसाठीच नव्हे, तर जीवनात शांतता, प्रेम आणि योग्य मार्गाचा शोध घेणाऱ्या प्रत्येकासाठी हा चित्रपट प्रेरणादायी ठरणार आहे.

चित्रपटाच्या निर्मात्यांनी सांगितले की, “हा चित्रपट त्या सर्वांसाठी आहे ज्यांच्या आयुष्यात गुरु आहेत आणि त्यांच्यासाठीही आहे जे आपल्या गुरुच्या शोधात आहेत. ‘हनुमान अंश’ आमच्यासाठी केवळ एक चित्रपट नाही, तर एक सेवा आहे. महाराजजींचा प्रेम, सेवा, विनम्रता आणि रामभक्तीचा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न आहे.” भावपूर्ण कथा, भक्तिरसाने ओतप्रोत संगीत आणि श्री नीब करौरी बाबा यांच्या प्रेरणादायी संदेशासह ‘हनुमान अंश’ प्रेक्षकांना एक वेगळा, प्रामाणिक आणि आध्यात्मिक सिनेमाई अनुभव देण्याचा प्रयत्न करणार आहे. ‘हनुमान अंश’ हा चित्रपट 31 जुलै 2026 रोजी देशभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार असून, चित्रपटाचा टीझर आता प्रदर्शित झाला आहे.

Exit mobile version