Download App

…म्हणून तेजस्विनीने सुरू केलं टेम्पल ट्रेलस! नव्या माध्यमातून करणार प्रेक्षकांचं मनोरंजन

Tejaswini Lonari ने स्वतःच एक यूट्यूब सुरू केलं पण या चॅनल वरून ती खूप खास गोष्टी प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार असल्याचं कळतंय.

Tejaswini Lonari started Temple Trails She will entertain the audience through a new medium : हल्ली अभिनयाच्या पलिकडे जाऊन अनेक कलाकार विविध गोष्टी करताना दिसतात अनेक कलाकारांनी व्यवसायात देखील पदार्पण केलं तर काही कलाकार त्यांचा अभिनयाच्या जोडीनं स्वतःच्या यूट्यूब मधून प्रेक्षकांना अनेक गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करतात. अभिनय करत असताना अश्या वेगवेगळ्या बाजू अनुभवून त्यातून प्रेक्षकांना काय वेगळं देता येईल अश्याच विचारातून अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने स्वतःच एक यूट्यूब सुरू केलं पण या चॅनल वरून ती खूप खास गोष्टी प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार असल्याचं कळतंय.

सुनेत्रा पवार RSSच्या कार्यक्रमात, रोहित पवार म्हणाले, ‘संघाच्या बैठकांना येण्याचा अजितदादांवर…’

“तेजक्राफ्ट” या स्वतःच्या निर्मिती संस्थतेतून तिने या चॅनलची सुरुवात केली असून ” टेम्पल ट्रेलस विथ तेजस्विनी ” ही पहिली वहीली सीरिज ती प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आली आहे. सीरिज च्या नावातून प्रेक्षकांना यात काय बघायला मिळणार याची थोडी कल्पना आली असेल पण थोडं थांबा ही आगळवेगळी सीरिज आपल्या समृध्द संपन्न महाराष्ट्राची खास सफर घडवणार आहे.टेम्पल ट्रेलस या सीरिज मधून महाराष्ट्रामधल्या वैविध्यपूर्ण संस्कृती, परंपरा आपले सण उत्सव विविध देवस्थान यांची माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न तेजस्विनी करणार आहे.

1 कोटी रुपये दंड अन् 3 वर्षांचा तुरुंगवास…, ऑनलाइन गेमिंग विधेयक राज्यसभेत मंजूर

टेम्पल ट्रेलस बद्दल सांगताना तेजस्विनी सांगते “हे फक्त मंदिरे दाखवण्याचं किंवा प्रवास सांगण्याचं माध्यम नाही. हा आपल्या परंपरेच्या मूळाशी जाण्याचा, श्रद्धा आणि इतिहास एकत्र अनुभवण्याचा प्रयत्न आहे. मला वाटतं, प्रत्येक मंदिराच्या भिंती एक कथा सांगतात आणि ती कथा प्रेक्षकांपर्यंत पोहचवणं हेच या मालिकेचं खरं उद्दिष्ट आहे. महाराष्ट्रात अनेक सुंदर मंदिर धार्मिक स्थळ आहेत आणि त्याचा मागची गोष्ट यातून मला प्रेक्षकांना सांगायची आहे म्हणून ही सीरिज करू या असं ठरवलं” लिका, चित्रपट, रियालिटी शो मधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी तेजस्विनी आता तिच्या या नव्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज आहे असं म्हणायला हरकत नाही.

follow us