Thakishi Sanvad : जागतिक रंगभूमी दिनाचं औचित्य साधून अभिनेत्री गिरिजा ओक हिने तिच्या नव्या नाटकाची घोषणा केली आहे. ठकीशी संवाद ( Thakishi Sanvad )या नाटकात ती मुख्य भूमिका साकारत असून तिच्या सोबतीला सुव्रत जोशी देखील दिसणार आहे. गिरिजा ने कायम वैविध्यपूर्ण भूमिका साकारून आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.
Loksabha Election : भाजपच्या स्टार प्रचारकांची घोषणा; महाराष्ट्रातले कोण?
रंगभूमी पासून तिने मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकली. गिरिजा ही कायम तिच्या अनोख्या भूमिकासाठी ओळखली जाते आणि आता पुन्हा एकदा रंगभूमी गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे. ” ठकीशी संवाद ” या नाटकाचा 10 मे 2024 रोजी शुभारंभाचा प्रयोग होणार आहे. सतीश आळेकर लिखित अनुपम बर्वे दिग्दर्शित “ठकीशी संवाद” नक्की काय असणार ने बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे,
सिनेमाच्या जगातील नाविन्य पूर्ण गोष्टींना उजाळा देण्यासाठी ‘हिरो हिरोईन’ सज्ज
गिरीजा ओकने मराठीसह हिंदी कलाविश्वात स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘ द व्हॅक्सिन वॉर’ आणि ‘जवान’ चित्रपटांमध्ये गिरीजाने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. आता जवान नंतर गिरिजा रंगभूमीवर बघायला मिळणार असून या नाटकात ती काय भूमिका साकारणार हे बघण उत्सुकतेच असणार आहे.
आजवर गिरिजा ने रंगभूमीवर वर अनेक नाटकात काम केली आणि आजच्या ” जागतिक रंगभूमी दिनाच्या ” निमित्ताने तिने तिच्या नव्या नाटकाची घोषणा केली आहे. ठकीशी संवाद या नाटकाचा विषय काय असणार ? या नाटकात गिरिजा काय भूमिका साकारणार ? हे आता नाट्यगृहात जाऊन पहायला लागणार.