सिनेमाच्या जगातील नाविन्य पूर्ण गोष्टींना उजाळा देण्यासाठी ‘हिरो हिरोईन’ सज्ज

सिनेमाच्या जगातील नाविन्य पूर्ण गोष्टींना उजाळा देण्यासाठी ‘हिरो हिरोईन’ सज्ज

Hero Heroine : सिनेमाच्या जगात जिथे अनेक नाविन्य पूर्ण गोष्टी कायम घडत असतात अश्याच गोष्टींना उजाळा देण्यासाठी ‘हिरो हिरोईन’ ( Hero Heroine ) सज्ज होत आहे. “हिरो हिरोईन,” हा नव्या चित्रपटाची निर्मिती दूरदर्शी निर्माती प्रेरणा अरोरा करत असून दिग्दर्शक सुरेश क्रिस्ना हे याच दिग्दर्शन करणार आहेत.

Shirdi Loksabha 2024 : वाकचौरेंना उमेदवारी पण महाविकास आघाडीत नाराजी, रुपवते बंडाच्या तयारीत

“टॉयलेट: एक प्रेम कथा” आणि “पॅडमॅन” यांसारख्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांसाठी ओळखली जाणारी, निर्माती प्रेरणा अरोरा पारंपारिक सिनेमाच्या सीमांना पुढे नेऊन कायम वैविध्यपूर्ण प्रोजेक्ट करते. हीरो हिरोईन चित्रपट उद्योगाच्या पार्श्वभूमीवर रील आणि वास्तविक यांच्यातील गुंतागुंतीची गोष्ट सांगणार आहे.

अनिल कपूरच्या लेकीचा खास सन्मान; टॉप ग्लोबल आर्ट म्यूझियम टेट मॉडर्नमध्ये सोनमची एन्ट्री !

मंत्रमुग्ध करणारी दिव्या खोसला ही यातून दिसणार आहे. पहिल्या आणि दुसऱ्या पोस्टर्सच्या लाँच ने प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे. प्रेरणा अरोरा या बद्दल म्हणते ” नावीन्यपूर्ण गोष्टीवर काम करण्याची इच्छा असताना या सारखा प्रोजेक्ट मिळणं ही भाग्याची गोष्ट आहे. हा चित्रपट नक्कीच काहीतरी वेगळं असणार आहे. याची आम्हाला खात्री आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज