अनिल कपूरच्या लेकीचा खास सन्मान; टॉप ग्लोबल आर्ट म्यूझियम टेट मॉडर्नमध्ये सोनमची एन्ट्री !

अनिल कपूरच्या लेकीचा खास सन्मान; टॉप ग्लोबल आर्ट म्यूझियम टेट मॉडर्नमध्ये सोनमची एन्ट्री !

Sonam Kapoor : हिंदी चित्रपट अभिनेत्री सोनम कपूर. स्टाईल, फॅशन अन् कलेच्या क्षेत्रातील (Sonam Kapoor) मोठं नाव. भारताची सांस्कृतिक राजदूत म्हणून सोनमला मानलं जातं. अशा हरहु्न्नरी सोनम कपूरचा खास सन्मान करण्यात आला आहे. जगातील आधुनिक आणि समकालीन कलेच्या मोठ्या संग्रहालयापैकी एक असलेल्या टेट मॉडर्नने दक्षिण आशिया अधिग्रहण समितीच्या सदस्यपदी सोनम कपूरची नियुक्ती केली आहे. टेट मॉडर्नद्वारे भारतीय आणि दक्षिण आशियाई कलेतील महत्त्वपूर्ण भूमिकेसाठी सामील करण्यात आलेली सोनम ही एकमेव भारतीय अभिनेत्री आहे.

यानंतर सोनम कपूर म्हणाली, सदस्यपदी माझी नियुक्ती करण्यात आली हा माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे. भारतीय आणि दक्षिण आशियाई कलेबद्दलचे माझे आकर्षण हा आयुष्यभराचा प्रवास आहे. या दरम्यान मी प्रत्येक संधीवर आमच्या कलाकारांना चॅम्पियन करण्याचा प्रयत्न केला आहे. दक्षिण आशियातील कलेचा समृद्ध वारसा आता जागतिक मान्यता मिळवत आहे.

सोनम कपूरने न्यूयॉर्कमध्ये फॅशन लिजेंड टॉमी हिलफिगरची भेट घेतली..

एक भारतीय आणि त्यातही दक्षिण आशियातील असल्याने या कलेच्या सकारात्मक बाजू पाहणे हा एक विशेषाधिकार माझ्यासाठी आहे. टेट मॉडर्नने मला दिलेली ही नवी जबाबदारी उल्लेखनीय कलाकृती आणि कलाकारांना प्रोत्साहन देण्यास उपयुक्त ठरणार आहे, असे सोनम कपूरने स्पष्ट केले.

माझ्यासाठी हा एक अभिमानाचा क्षण आहे. फक्त माझ्यासाठीच नाही तर संपूर्ण कला क्षेत्रासाठी चांगली गोष्ट आहे. या माध्यमातून दक्षिण आशियातील कलेची उपस्थिती जगाच्या कानाकोपऱ्यात वाढविण्यासाठी एकत्रित काम करणार असल्याचे सोनम कपूरने सांगितले. दरम्यान, टेट मॉडर्नद्वारे भारतीय आणि दक्षिण आशियातील कलांना चॅम्पियन बनवण्याच्या कामात महत्वाच्या भूमिकेसाठी सोनम कपूरची निवड करण्यात आली.

Blind Teaser Out: 4 वर्षांनंतर ती परत आलीय! सोनम कपूरच्या ‘ब्लाइंड’चा टीझर प्रदर्शित

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube