Thalapathy Vijay Movie Poster: थलापती विजयच्या ‘लिओ’ सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित

Vijay’s Leo Telugu Poster Released: दाक्षिणात्य अभिनेता थलापती विजयच्या आगामी सिनेमाचे तेलुगू पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे. विजयचे चाहते त्याच्या या पोस्टरची खुप दिवसांपासून वाट बघत होते. (Thalapathy Vijay Leo Poster Out) सिनेमाची घोषणा आणि फर्स्ट लूक रिव्हील झाल्यापासून त्याचे चाहते ‘लिओ’ची मोठ्या आतुरतेने वाट बघत होते.   View this post on Instagram   A […]

Vijay's Leo Telugu Poster Released

Vijay's Leo Telugu Poster Released

Vijay’s Leo Telugu Poster Released: दाक्षिणात्य अभिनेता थलापती विजयच्या आगामी सिनेमाचे तेलुगू पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे. विजयचे चाहते त्याच्या या पोस्टरची खुप दिवसांपासून वाट बघत होते. (Thalapathy Vijay Leo Poster Out) सिनेमाची घोषणा आणि फर्स्ट लूक रिव्हील झाल्यापासून त्याचे चाहते ‘लिओ’ची मोठ्या आतुरतेने वाट बघत होते.


थलापती विजयचा आगामी सिनेमा ‘लिओ’चे पोस्टर अखेर चाहत्यांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाच्या पोस्टरमध्ये विजय विचारामध्ये हरवला असल्याचे बघायला मिळत आहे. या पोस्टमध्ये त्याने घातलेले टी-शर्ट खूप काही सांगायचं प्रयत्न करत असल्याचे बघायला मिळत आहे. या टी -शर्ट असलेल्या चित्रामध्ये विजय काश्मीरमध्ये बर्फात डोंगरावर धावत असताना दिसत आहे.

तसेच पोस्टर ‘Keep Calm And Avoid Battle’ असे देखील लिहिले असल्याचे दिसत  आहे. थलापती विजय आणि सिनेमाचे दिग्दर्शक नागेश कनागराज यांनी त्यांच्या सोशल मीडियावर (Social media) हे पोस्टर शेअर करत सांगितले आहे. पोस्टर प्रदर्शित झाल्यावर थलापती विजय सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. तसेच दाक्षिणात्य अभिनेता काश्मीरच्या खोऱ्यात नेमकं काय करत आहे असा प्रश्न देखील काही नेटकऱ्यांना पडला असल्याचे बघायला मिळत आहे. तसेच या सिनेमाच्या कथनकाबद्दल मोठी उत्सुकता देखील चाहत्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे.

रणबीर कपूरचा बहुचर्चित Animal येणार ‘या’ तारखेला; प्रदर्शनाची तारीख अखेर जाहीर

थलापती विजयचा ‘लिओ’ हा सिनेमा १९ ऑक्टोबर दिवशी देशभरात प्रदर्शित होणार आहे. लोकेश कनागराज लिखित आणि दिग्दर्शित हा सिनेमा अ‍ॅक्शन थ्रिलर सिनेमा असणार आहे. या सिनेमामध्ये थलापती विजय मुख्य भूमिका साकारणार आहे. संजय दत्त, त्रिशा, अर्जुन सर्जा, गौतम मेनन, मायस्किन आणि प्रिया आनंद हे कलाकार सिनेमामध्ये महत्त्वाच्या भूमिकेमध्ये बघायला मिळणार आहेत. लोकेश कनागराजसह रत्ना कुमार आणि दिरज वैद्य यांनी देखील या सिनेमाची पटकथा लिहिली आहे. युनाइटेड किंडममध्ये ‘लिओ’ची अ‍ॅडव्हान्स बुकिंग जोरदार होत असल्याचे समोर आले आहे. सिनेमाचे ऑडिओ लॉंच चेन्नईमध्ये होणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

Exit mobile version