‘स्वातंत्र्य सौभाग्य’ने पटकावला ‘अहिल्यानगर महाकरंडक’; विकास कांबळे सर्वोत्कृष्ट अभिनेता, आर्या राणे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

स्पर्धेत प्रथम येणाऱ्या संघास १ लाख ६१ हजार १११ रुपये रोख, अहिल्यानगर महाकरंडक आणि प्रमाणपत्र असे पारितोषिक देण्यात आले.

News Photo   2026 01 18T211555.103

'स्वातंत्र्य सौभाग्य'ने पटकावला 'अहिल्यानगर महाकरंडक'; विकास कांबळे सर्वोत्कृष्ट अभिनेता, आर्या राणे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी आणि मानाची (Film) एकांकिका स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘अहिल्यानगर महाकरंडक २०२६’ या एकांकिका स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आज (ता. १८) सावेडी उपनगरातील माऊली सभागृहात उत्साहात झाला. ही स्पर्धा १५ ते १८ जानेवारी या कालावधीत झाली. या स्पर्धेत ‘स्वातंत्र्य सौभाग्य’ एकांकिकेने अहिल्यानगर महाकरंडक’ पटकावला. तर विकास कांबळे (घरघर) सर्वोत्कृष्ट अभिनेता, आर्या राणे (स्वातंत्र्य सौभाग्य) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली.

पारितोषिक समारंभाच्या वेळी आमदार संग्राम जगताप, अभिनेते, निर्माते-दिग्दर्शक महेश मांजरेकर, अभिनेता-निर्माता भरत जाधव, अभिनेत्री शिवानी रांगोळे, परीक्षक अभिनेता, निर्माता-दिग्दर्शक विजय पाटकर, अभिनेता, दिग्दर्शक शिवराज वायचळ, झी मराठीच्या प्रोग्रामिंग हेड कल्याणी पठारे, अहिल्यानगर महाकरंडक स्पर्धेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया, स्पर्धेचे संयोजक स्वप्नील मुनोत, महावीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष हर्षल बोरा, सोहम ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक अमित बुरा आदींची प्रमुख उपस्थिती होती.यंदाच्या स्पर्धेच्या वेळी पंढरीचा पांडुरंग व वारकरी संप्रदायाची थीम वापरण्यात आली. त्यामुळे रंगकर्मींची नाट्यपंढरी असे स्लोगन या स्पर्धेला देण्यात आले आहे.

स्पर्धेत प्रथम येणाऱ्या संघास १ लाख ६१ हजार १११ रुपये रोख, अहिल्यानगर महाकरंडक आणि प्रमाणपत्र असे पारितोषिक देण्यात आले. मागील १२ वर्षांपासून ‘अहमदनगर महाकरंडक’ नावाने प्रसिद्ध असणारी ही स्पर्धा जिल्ह्याचे नाव ‘अहिल्यानगर’ असे बदलल्याने मागील दोन वर्षांपासून ‘अहिल्यानगर महाकरंडक’ नावाने ओळखली जात आहे. यंदाचं स्पर्धेचं हे १३वे वर्ष आहे. मागील एका तपात ही स्पर्धा राज्यातील सर्वात मोठी मानाची एकांकिका स्पर्धा म्हणून नाट्य वर्तुळात ओळख निर्माण केली आहे. यंदाचं ‘रंगकर्मींची नाट्यपंढरी’ हे ब्रीदवाक्य आहे.

ज्येष्ठ संगीतकार इलयाराजा यांना पद्मपाणि पुरस्कार जाहीर; चित्रपट महोत्सवात होणार वितरण

अनुष्का मोशन पिक्चर्स अ‍ॅण्ड एंटरटेन्मेंट, शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन प्रायोजित, श्री महावीर प्रतिष्ठान आयोजित व आय लव्ह नगरच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा झाली. लेट्सअप हे या स्पर्धेचे डिजिटल पार्टनर होते. रंगकर्मींच्या अभिनय कौशल्याने सजलेल्या ‘अहिल्यानगर महाकरंडक’ एकांकिका स्पर्धा २०२६ या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या एकांकिका स्पर्धेला झी युवा या वाहिनीची साथ मिळाली. झी युवा ही वाहिनी प्रायोजक म्हणून ‘अहिल्यानगर महाकरंडक’ २०२६ स्पर्धेत आपली भूमिका बजावली.

अहिल्यानगर महाकरंडक २०२६

निकाल

सांघिक पारितोषिके

एकांकिका

प्रथम क्रमांक – स्वातंत्र्य सौभाग्य (मुलुंड वाणिज्य महाविद्यालय)

द्वितीय क्रमांक – घरघर (सोहन प्रोडक्शन, कोल्हापूर)

तृतीय क्रमांक – वात्सल्यम (दयानंद कला महाविद्यालय, लातूर)

चतुर्थ क्रमांक – बरड (रंगपंढरी, पुणे)

उत्तेजनार्थ – E=MC2 (चंद्ररथ थिएटर्स, नागपूर)

सर्वोत्कृष्ट विनोदी एकांकिका – काही प्रॉब्लेम ए का? (रसाभिनय, अहिल्यानगर)

परीक्षक शिफारस एकांकिका – सुपर ह्युमन्स (coal-kala, मुंबई)

——

उत्कृष्ट अभिनय संच – मढं निघालं अनुदानाला

——

सर्वोत्कृष्ट पोस्टर – खिच्याक

——

दिग्दर्शन

प्रथम क्रमांक – अमित पाटील (स्वातंत्र्य सौभाग्य)
‌द्वितीय क्रमांक – प्रमोद पुजारी (घरघर)
तृतीय क्रमांक – विजय म्हस्के (वात्सल्यम)
उत्तेजनार्थ – अजय पाटील (स्वस्तिकाची ट्रॅजेडी)
उत्तेजनार्थ – विशाल चव्हाण (ग्वाही)

———

अभिनेता

सह-अभिनेता प्रथम क्रमांक – महेश गावडे (बरड)

विनोदी कलाकार

प्रथम क्रमांक – अभिजित खैरे (कुछ तो लोग कहेंगे)
द्वितीय क्रमांक – राहुल सुराणा (झूम बराबर झूम)

अहिल्यानगर महाकरंडक विशेष लक्षवेधी अभिनेता – विजय म्हस्के (वात्सल्यम)

———-

अभिनेता

प्रथम क्रमांक – विकास कांबळे (घरघर)
द्वितीय क्रमांक – संदीप दंडवते (इनोसंट)
तृतीय क्रमांक – पावन पोटे (काही प्रॉब्लेम ए का?)
उत्तेजनार्थ – आर्य पालव (स्वातंत्र्य सौभाग्य)
उत्तेजनार्थ – प्रज्ज्वल पडळकर (वामन आख्यान)

अहिल्यानगर महाकरंडक विशेष लक्षवेधी अभिनेता – विजय म्हस्के (वात्सल्यम)

——-

अभिनेत्री

प्रथम क्रमांक – आर्या राणे (स्वातंत्र्य सौभाग्य)
‌द्वितीय क्रमांक – निलम वाडेकर (बरड)
तृतीय क्रमांक – तनिष्का देशमुख (काही प्रॉब्लेम ए का?)
उत्तेजनार्थ – मनस्वी लघाडे (द गर्दभ गोंधळ)
उत्तेजनार्थ – अपर्णा घोगरे (थीमक्का)

अहिल्यानगर महाकरंडक विशेष लक्षवेधी अभिनेत्री – सई जाधव (घरघर)

——-

संगीत

प्रथम क्रमांक – प्रणव चांदोरकर, ऋषभ करंगुटकर (स्वातंत्र्य सौभाग्य)
‌द्वितीय क्रमांक – संदीप घुंगरे, सांदिप कुंगरे (वात्सल्यम)
तृतीय क्रमांक – तनिष्क रणवीर (काही प्रॉब्लेम ए का?)

——–

प्रकाश योजना

प्रथम क्रमांक – साई शिरसेकर (स्वातंत्र्य सौभाग्य)
‌द्वितीय क्रमांक – सिद्धोत्विक (स्वतिकाची ट्रेजडी)
तृतीय क्रमांक – सिध्देश नांदलमकर (थीमक्का)

——

नेपथ्य

प्रथम क्रमांक – सिध्देश नांदलसकर (थीमक्का)
‌द्वितीय क्रमांक – ओमकार वडके \ महेश चौगुले (ग्वाही)
तृतीय क्रमांक – सोहम चव्हाण (घरघर)

——-

रंगभूषा

प्रथम क्रमांक – तेजश्री पिलनकर (मढं निघालं अनुदानाला)
द्वितीय क्रमांक – अदिती (थीमक्का)

——-

वेशभूषा

प्रथम क्रमांक – तेजश्री पिलनकर (मढं निघालं अनुदानाला)
‌द्वितीय क्रमांक – दीक्षा कुळ्ये (वामन आख्यान)

——-

लेखन

प्रथम क्रमांक – सिद्धेश साळवी (स्वातंत्र्य सौभाग्य)
द्वितीय क्रमांक – संदीप दंडवते (इनोसंट)
तृतीय क्रमांक – प्रमोद पुजारी (घरघर)
उत्तेजनार्थ – अनिकेत सपकाळे \ रुपेश आहिरे (बोल बे खौफ)

Exit mobile version