अहिल्यानगर महाकरंडकचा मानकरी ठरला पुण्यातील ‘सखा’, ब्रह्यपुरा, गुड बाय किस एकांकिका द्वितीय

  • Written By: Published:
अहिल्यानगर महाकरंडकचा मानकरी ठरला पुण्यातील ‘सखा’, ब्रह्यपुरा, गुड बाय किस एकांकिका द्वितीय

Ahilyanagar Mahakarandak: राज्यात सगळ्यात मोठी आणि मानाची एकांकिका स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणारा ‘अहिल्यानगर महाकरंडक’ (Ahilyanagar Mahakarandak) यंदा सखा एकांकिकेने पटकाविला. तर मुंबईतील बह्यपुरा आणि गुड बाय किस या एकांकिकांना विभागून द्वितीय पारितोषिक देण्यात आले. तर तृतीय पारितोषिकही विभागून देण्यात आले आहे. साताऱ्याच्या लेबल आणि मुंबईच्या अविघ्नेया एकांकिकेला तृतीय पारितोषिक मिळाले. तर अनिल आव्हाड (गुडबाय किस) सर्वोत्कृष्ट अभिनेता, समृद्धी पवार (नेक्स ऑन व्हिल्स) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली.

पारितोषिक समारंभाच्या वेळी आमदार संग्राम जगताप, आमदार सत्यजित तांबे, परीक्षक अभिनेता आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे, निर्माता आणि दिग्दर्शक आशिष वाघ, दिग्दर्शक उमेश शुक्ला, दिग्दर्शक मयूर हरदास, अहिल्यानगर महाकरंडक स्पर्धेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया, महावीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष हर्षल बोरा, प्रतिष्ठानच्या अध्यक्षा आशाताई फिरोदिया, रिंकू फिरोदिया, स्पर्धेचे संयोजक स्वप्नील मुनोत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. फस्क्लास दाभाडे सिनेमाचे अभिनेत्री आणि निर्माती क्षिती जोग आणि अभिनेता, लेखक, दिग्दर्शक हेमंत ढोमे यांचीही सोहळ्याला उपस्थिती होती.

मागील 11 वर्षांपासून ‘अहमदनगर महाकरंडक’ नावाने प्रसिद्ध असणारी ही स्पर्धा जिल्ह्याचे नाव ‘अहिल्यानगर’ असे बदलल्याने आता ‘अहिल्यानगर महाकरंडक’ नावाने ओळखली जाणार आहे. यंदाचं स्पर्धेचं हे 12 वे वर्ष आहे. मागील एका तपात ही स्पर्धा राज्यातील सर्वात मोठी मानाची एकांकिका स्पर्धा म्हणून नाट्य वर्तुळात ओळख निर्माण केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ३५१ वर्षे पूर्ण झाल्या निमित्त या एकांकिका स्पर्धेचं यंदाचं ‘उत्सव रंगभूमीचा, सोहळा शिवराज्याभिषेकाचा’ हे ब्रीदवाक्य होते.

अनुष्का मोशन पिक्चर्स अ‍ॅण्ड एंटरटेन्मेंट, शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन प्रायोजित, श्री महावीर प्रतिष्ठान आयोजित व आय लव्ह नगरच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा झाली. लेट्सअप हे या स्पर्धेचे डिजिटल पार्टनर होते. रंगकर्मींच्या अभिनय कौशल्याने सजलेल्या ‘अहिल्यानगर महाकरंडक’ एकांकिका स्पर्धा 2025 या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या एकांकिका स्पर्धेला झी युवा या वाहिनीची साथ मिळाली. झी युवा ही वाहिनी प्रायोजक म्हणून ‘अहिल्यानगर महाकरंडक’ 2025 स्पर्धेत आपली भूमिका बजावली.

सर्व कलाकारांच्या प्रतिसादामुळे स्पर्धा मोठी झाली-नरेंद्र फिरोदिया
नरेंद्र फिरोदिया म्हणाले, महाकरंडकचे हे बारावे वर्षे आहे. पण यंदा नवीन सुरुवात झाली आहे. कारण आमच्या गावाचे नाव बदलले आहे. गाव तोच पण नाव नवीन आहे. इतिहास तोच पण ऊर्जा नवीन आहे. या वर्षापासून अहिल्यानगर महाकरंडक हे सुरू झाले आहे. 2013 पासून हा प्रवास सुरू झाला होता. तो आता सर्व कलाकारांच्या प्रतिसादामुळे मोठा करंडक बनला आहे. या वर्षासाठी करंडकासाठी थिम ही शिवराज्यभिषेकाला 351 वर्षे पूर्ण होत असल्याचे आहे. ती थीम घेऊन शिवकालीन वस्तूंचे प्रदर्शन भरविले होते. ते लोकांना आवडले आहे. स्पर्धेला बारा वर्षे पूर्ण झाले आहे. दरवर्षी स्पर्धेचा दर्जा वाढत आहे.

पूर्वीच्या काळात राजाश्रय, आता फिरोदिया यांचा कलाकारांना पाठिंबा-सत्यजीत तांबे

आमदार सत्यजीत तांबे म्हणाले, महाकरंडक उंची दरवर्षी वाढत आहे. पूर्वीच्या काळात कलेला राजाश्रय होता. आता नरेंद्र फिरोदिया यांचा पाठिंबा कलाकारांना मिळत आहे. नवनवीन कलाकारांना संधी दिले जाते. वेगवेगळ्या लोकांना व्यासपीठ दिले जात आहे.

करंडकाचे ट्रॉप थ्री स्पर्धेमध्ये नाव-संग्राम जगताप

आमदार संग्राम जगताप म्हणाले, अहिल्यानगर महाकरंडकाच्या माध्यमातून अनेकांना व्यासपीठ मिळाले आहे. या करंडकाचे राज्यातील टॉप थ्री स्पर्धेमध्ये नाव घेतले जात आहे. यामध्ये नरेंद्र फिरोदिया यांचे मोठे योगदान आहे.

सांघिक पारितोषिके

प्रथम क्रमांकः सखा – एमएएस इन्स्टिट्यूट पुणे -(1,51,111 रोख रक्कम, महाकरंडक व प्रमाणपत्र)
—————–
द्वितीय क्रमांकः विभागून
ब्रह्मपुरा- महर्षी दयानंद कॉलेज, मुंबई
गुड बाय किस-जिराफ थियेटर, मुंबई
(1,11,111 रुपये रोख रक्कम, करंडक आणि प्रमाणपत्र)
————————
तृतीय क्रमांकः विभागून
लेबल- निर्मिती नाट्यसंस्था, सातारा
अविघ्नेया -सिडनहॅम कॉलेज, मुंबई
(51,111 रुपये रोख रक्कम, करंडक आणि प्रमाणपत्र)
—————–
चतुर्थ क्रमांकः कुक्कुर – सतीश प्रधान ज्ञानसाधना कॉलेज, ठाणे.
उत्तेजनार्थ-स्पर्षाची गोष्ट – विधी वझे रंगकर्मी, मुंबई
——————————
सर्वोत्कृष्ट विनोदी एकांकिका : विभागून
टेबल नंबर १२ को क्या चाहिये – व्ही.डी.एम. स्टुडिओ, अहिल्यानगर
सेक्स ऑन व्हील्स – तिसरी घंटा, मुंबई
———————
परिक्षक शिफारस एकांकिका
त्यात काय? – एकदम कडक नाट्यसंस्था, मुंबई
————————-
वैयक्तिक पारितोषिके
दिग्दर्शन
प्रथम क्रमांकः अजय पाटिल – कुक्कुर
द्वितीय क्रमांकः ओम नितीन चव्हाण – सखा
तृतीय क्रमांकः संकेत पाटिल आणि संदेश रणदिवे – चिनाब से रावी तक
उत्तेजनार्थ : राकेश जाधव – गुड बाय किस
उत्तेजनार्थ : वैभव काळे – ब्रँडेड बाय सडकछाप
—————————-
अभिनेता
प्रथम क्रमांकः अनिल आव्हाड – गुड बाय किस
द्वितीय क्रमांकः ओम चव्हाण आणि उत्कर्ष दुधाने (विभागून) – सखा
तृतीय क्रमांकः प्रविण यादव – लेबल
उत्तेजनार्थ : पवन पोटे – देखावा
उत्तेजनार्थ : राहुल पेडणेकर – स्पर्षाची गोष्ट
विशेष लक्षवेधी अभिनय : महेश कापरेकर – क्रॅक्स इन द मिरर
सह-अभिनेता-संकेत शहा – टेबल नं. १२ को क्याचाहिये
——————-
विनोदी कलाकार :
प्रथम क्रमांकः ऋषिकेश वांबूरकर – टेबल नंबर १२ को क्या चाहिये
द्वितीय क्रमांकः सचिन सावंत – लेबल
—————————–
अभिनेत्री
प्रथम क्रमांकः समृद्धी पवार- सेक्स ऑन व्हील्स
‌द्वितीय क्रमांकः हेमांगी आरेकर – त्यात काय!!
तृतीय क्रमांकः अक्षता टाले – गुडबाय किस
उत्तेजनार्थ : समृद्धी भोसले – देव बापा?
उत्तेजनार्थ : श्रावणी ओव्हळ – अविघ्नेया
सह-अभिनेत्री-
प्रथम क्रमांकः सेजल जाधव – क्रॅक्स इन द मीरर

नेपथ्यः
प्रथम क्रमांकः प्रणाळ पारसेकर आणि क्षितिजा वाघमारे – जुगाड लक्ष्मी
‌द्वितीय क्रमांकः देवाशीश धरवडे – चिनाब से रावी तक
तृतीय क्रमांकः सिध्देश नांदलस्कर – कुक्कुर
—————-
प्रकाश योजना :
प्रथम क्रमांकः मयूरेश शहा – सखा
द्वितीय क्रमांकः सिदेश नांदलसकर – जुगाड लक्ष्मी
तृतीय क्रमांकः साई शिरसेकर – गुडबाय किस
——————–
संगीत :
प्रथम क्रमांकः अक्षय घांगट- जुगाड लक्ष्मी
द्वितीय क्रमांकः दुर्गेश खिरे – सखा
तृतीय क्रमांकः रोहन पटेल – गुड बाय किस

follow us
  • fb
  • instagram
  • youtube