Download App

The Indrani Mukerjea Story ला मुंबई हायकोर्टाकडून स्थगिती, नेटफ्लिक्सलाही फटकारले

  • Written By: Last Updated:

The Indrani Mukerjea Story : शीना बोरा हत्याकांडावर आधारित असलेली इंद्राणी मुखर्जी स्टोरी ( The Indrani Mukerjea Story) ही वेब सिरीज उद्या 23 फेब्रुवारी 2024 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार होती. मात्र त्या अगोदरच मुंबई हायकोर्टाकडून त्यावर स्थगिती आणण्यात आली आहे. तसेच कोर्टाने नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मलाही फटकारले आहे. कारण ही सिरीज नेटफ्लिक्सवर प्रसारित होणार होती.

आरोप सिद्ध करा मी संन्यास घेईल, मंत्री विखेंचे राऊतांना ओपन चॅलेंज

त्यामुळे द इंद्राणी मुखर्जी स्टोरी या डॉक्युमेंटरी सिरीजच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीत. तसेच या प्रकरणावरची पुढची सुनावणी आता 29 फेब्रुवारी 2024 ला होणार आहे. दरम्यान या वेब सिरीजमुळे या प्रकरणाच्या चौकशीवर परिणाम होत आहे. असा दावा सीबीआयकडून करण्यात आला होता. त्यामुळे रिलीजच्या अगोदर नेटफ्लिक्सला ही सिरीज सीबीआयच्या अधिकाऱ्यांना स्पेशल स्क्रीनिंग करून दाखवावी लागणार असल्याचं कोर्टाने सांगितलं आहे. या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती मंजुष देशपांडे यांच्यासमोर पार पडली.

शीना बोरा हत्याकांड काय आहे?

2012 मध्ये मुंबईमध्ये शिनाबोरा यांची हत्या करण्यात आली होती. मात्र तीन वर्षे या प्रकरणात कोणताही तपास लागला नव्हता. तर 2015 मध्ये शिनाची आई इंद्राणी मुखर्जी यांना यामध्ये अटक करण्यात आली. इंद्राणी यांनी दोन लग्न केली होती. पहिल्या लग्नामध्ये त्यांना शिनाबोरा ही मुलगी होती. तर दुसरे लग्न त्यांनी पीटर मुखर्जी या प्रसिद्ध टीव्ही इंडस्ट्री संबंधित व्यावसायिक अशी केलं होतं.

‘जयंत पाटील शेवटचा डाव आखणार..,’;’दिल्लीसुद्धा पवारांना घाबरते’ म्हणणाऱ्यांना विखेंचा मार्मिक टोला

या सिरीजचं दिग्दर्शन शाना लेवी आणि उराज बहल यांनी केलं आहे. सिरीजमध्ये इंद्राणी मुखर्जी आणि त्यांची मुलं विधी मुखर्जी आणि मिखाइल बोरा यांच्यासह अनुभवी पत्रकार आणि वकील पाहायला मिळणार आहेत. जे आपला याप्रकरणी अनुभव शेअर करणार आहेत. तसेच या केसबद्दल आणखी काही गोष्टी या सिरीजच्या माध्यमातून समोर येतील. ज्या आजपर्यंत समोर आलेल्या नाहीत.

follow us