Sai Tamhankar: भारतात नेटफ्लिक्सवर नंबर 1वर सईचा ‘भक्षक’ सिनेमा होतोय ट्रेंड

Sai Tamhankar: भारतात नेटफ्लिक्सवर नंबर 1वर सईचा ‘भक्षक’ सिनेमा होतोय ट्रेंड

Sai Tamhankar On OTT platform: ‘श्री देवी प्रसन्न’ (Sridevi Prasanna) च्या रिलीज नंतर सई ताम्हणकर (Sai Tamhankar) पुन्हा एकदा आपल्या अभिनयाची जादू दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. गेल्या आठवड्यात सईचा मराठी चित्रपट रिलीज झाल्यानंतर आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT ) झळकली. आणि सईनं पुन्हा एकदा प्रेक्षकांची मन जिंकली ती नेटफ्लिक्स वर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘भक्षक’ या चित्रपटातून. “भक्षक” (Bhakshak Movie ) हा चित्रपट सध्या भरतात नेटफ्लिक्सवर नंबर वन वर ट्रेंड करत आहेत. सईच्या कामाची नेहमीच चर्चा होते आणि आता पुन्हा भक्षक मुळे सई चर्चेत आली आहे. 2024 मधला सईचा पहिला बॉलिवुड चित्रपट आणि तो सुद्धा आता ट्रेंड करतोय. सईनं भक्षक मधून पुन्हा एकदा पुनरागमन करून “जस्मीत गौर” या एका पोलिसअधिकाऱ्याची भूमिका साकारून तिनं तिचा उल्लेखनीय अभिनय प्रेक्षकांसमोर ठेवला आहे. प्रेक्षकांनी या भूमिकेला देखील तितकच प्रेम दिलं हे खरंय ! हा सिनेमा समाजातील विषयावर भाष्य करणारा असून त्यातून एक महत्वाचाही संदेश देण्यात आला आहे.

सईनं आजवर वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. स्त्री सक्षमीकरण असलेल्या तिच्या आजवरच्या अनेक भूमिकांतून आपण सगळ्यांनी तिला बघितलं. तर या सिनेमातील तिच्या अनोख्या भूमिकेचं विशेष तोंडभरून कौतुक केलं जातंय हे देखील तितकच खरं! भक्षकमध्ये जस्मीत गौर ही चाहत्यांना आपलंसं करणारी ठरली आहे आणि म्हणून सईनं पुन्हा एकदा प्रेक्षकांना मोहित केलं आहे. चित्रपटात अनेक बड्या कलाकारांसोबत सई दिसली आहे. चित्रपटाचा विषय वेगळाच असल्यानं हा चित्रपट खास ठरतोय.

भारतात नेटफ्लिक्सवर भक्षक ट्रेंड 1 वर असून आता सई साठी हा चित्रपट नक्कीच खास ठरतोय. नेहमीच काहीतरी वेगळ्या पद्धतीच्या भूमिका साकारण्याकडे सईचा कल असतो आणि ती ते उत्तम रित्या साकारते. कामाचं सातत्य जपत तिने आजवर अनेक काम करून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. मराठीच्या सोबतीने “सई” सारखी अभिनेत्री बॉलिवुड मध्ये देखील आपल्या कामाने प्रेक्षकांना मोहित करतेय. मराठी प्रेक्षकांच्या सोबतीने तिने हिंदी मधील प्रेक्षकांना आपलंसं केल आहे.

‘बदलाची दूत असलेली स्त्री भारतीय चित्रपटसृष्टीत दुर्मिळ’; भूमी पेडणेकरने सांगितला किस्सा

अल्पवयीन मुलींवर होणारे अन्याय आणि अत्याचार यामुळे पुढे जाऊन त्यांना कोणत्या परिस्थितीला सामोरे जावे लागते, यावर या चित्रपटातून भाष्य करण्यात आल आहे. मराठीच्या पलिकडे जाऊन बॉलिवूडमध्ये सईनं तिची एक अनोखी ओळख निर्माण केली आहे. सईनं पहिल्यांदाच रेड चिली एंटरटेनमेंट सोबत हा खास प्रोजेक्ट केला आहे. तर येत्या काळात ती पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये अशा अनोख्या भूमिका साकारताना दिसणार आहे. 2024 वर्षातला सईचा हा दुसरा प्रोजेक्ट्स आहे. भक्षक या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर यात भूमी पेडणेकर, सई ताम्हणकर आणि संजय मिश्रा , आदित्य श्रीवास्तव यांच्या मुख्य भूमिका आहेत.

सईच्या कामाविषयी बोलायचं झालं तर तिचा श्रीदेवी प्रसन्न हा मराठी चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. या सिनेमात तिच्यासोबत सिद्धार्थ चांदेकर मुख्य भूमिकेत पाहायला मिळाला आहे. हिंदीत सईचा भक्षक आता प्रेक्षकांना मोहित करत आहे. आगामी काळात सई नक्कीच दमदार भूमिका साकारणार असल्याचं कळतंय. श्री देवी प्रसन्न , भक्षक आता पुढे काय ? या प्रश्नाचं उत्तर सई लवकरच प्रेक्षकांना देईन.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज