‘दो दीवाने सहर में’ मधील प्रेममय गाणं ‘आसमा’ काही तासांत येणार प्रेक्षकांच्या भेटीला !

Do Deewane Sahar Mein चित्रपटातील अतिशय फ्रेश आणि नवीन साउंड ऑफ लव्ह असलेलं गाणं ‘आसमा’ आज 22 जानेवारी 2026 रोजी रिलीज होणार आहे.

Do Deewane Sahar Mein

Do Deewane Sahar Mein

The love song ‘Aasama’ from ‘Do Deewane Sahar Mein’ will be released in a few hours : झी स्टुडिओज आणि भन्साली प्रोडक्शन्सच्या आगामी चित्रपट *‘दो दीवाने सहर में’*चा सुंदर टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, तो एका रिअल, सरप्रायझिंग आणि अत्यंत रिलेटेबल अशा प्रेमकथेची झलक दाखवतो. टीझरला सर्वत्र प्रचंड सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, या इम्परफेक्टली परफेक्ट लव्ह स्टोरीबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.

29 पालिकांच्या महापौरपदाचे भवितव्य आज ठरणार: मंत्रालयात थोड्याचवेळात आरक्षणाची सोडत

या वाढत्या उत्साहात आता मेकर्स प्रेक्षकांना चित्रपटाच्या रोमँटिक मूडमध्ये आणखी बुडवण्यासाठी सज्ज झाले आहेत. चित्रपटातील अतिशय फ्रेश आणि नवीन साउंड ऑफ लव्ह असलेलं गाणं ‘आसमा’ आज 22 जानेवारी 2026 रोजी रिलीज होणार आहे. आपल्या सुरेल, सुकून देणाऱ्या धूनमुळे हे गाणं या सीझनमधील एक क्लटर-ब्रेकिंग लव्ह सॉन्ग ठरणार असून, आतापर्यंत ऐकलेल्या गाण्यांपेक्षा पूर्णपणे वेगळं आणि खास वाटतं.

कल्याण-डोंबिवलीत महापौर कोणाचा? भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांनी दिले मोठे संकेत…

मेकर्सनी सोशल मीडियावर ‘आसमा’ या फ्रेश आणि क्लटर-ब्रेकिंग गाण्याचा एक छोटासा टीझर शेअर केला आहे. या गाण्याच्या धून मनाला शांतता देणाऱ्या आणि थेट हृदयाला स्पर्श करणाऱ्या आहेत. गाणं उद्या रिलीज होत असून, पोस्टसोबत त्यांनी कॅप्शन दिलं आहे—
“प्रत्येक इंपरफेक्टली परफेक्ट कथेला स्वतःचं एक अँथम असतं, आणि ही आहे आमच्या ‘आसमा’ची छोटीशी झलक. गाणं उद्या रिलीज होईल!

आरक्षणाची गुगली अन् सत्तेचं समीकरण! राज्यातील 29 महापालिकांसाठी आज आरक्षण सोडत…

या सीझनमधील अत्यंत फ्रेश साउंड ऑफ लव्ह असलेलं ‘आसमा’ हे एक सुंदर गाणं असून, ते जुबिन नौटियाल आणि नीति मोहन यांनी गायले आहे. या गाण्याचं संगीत हेशम अब्दुल वहाब यांनी दिलं असून, गीतलेखन अभिरुची चंद यांनी केलं आहे. या गाण्यामुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी शिगेला पोहोचली आहे.

पोलिस बंदोबस्तात पैसे वाटतो…निवडणुकीत आमदार नारायण कुचेंकडून पैसेवाटप? कथित रेकॉर्डिंग व्हायरल..

झी स्टुडिओज आणि भन्साली प्रोडक्शन्स सादर करत आहेत ‘दो दीवाने सहर में’, ज्यात मृणाल ठाकूर आणि सिद्धांत चतुर्वेदी प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाचं दिग्दर्शन रवि उद्यावर यांनी केलं असून, संजय लीला भन्साली, प्रेरणा सिंग, उमेश कुमार बंसल आणि भरत कुमार रंगा यांनी रवि उद्यावर फिल्म्सच्या सहयोगाने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘दो दीवाने सहर में’ हा चित्रपट 20 फेब्रुवारी 2026 रोजी थिएटर्समध्ये प्रदर्शित होणार आहे.

Exit mobile version