‘द महाराष्ट्र फाईल’ चित्रपटावरून नवा वाद; मराठा क्रांती मोर्चाची सेन्सॉर बोर्ड आणि मुख्यमंत्र्यांकडे धाव

The Maharashtra Files- या चित्रपटामध्ये मराठा समाजाचा उल्लेख कथितपणे ‘छोटा मराठा’ असा करण्यात आल्याचा दावा मराठा क्रांती मोर्चाने केला आहे.

The Maharashtra Files

The Maharashtra Files

The Maharashtra Files: राज्यभरात चर्चेचा विषय ठरलेल्या आणि अनेक ठिकाणी प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असलेल्या ‘द महाराष्ट्र फाईल’ ( The Maharashtra Files) या चित्रपटावरून नवा वाद निर्माण झाला आहे. या चित्रपटामध्ये मराठा समाजाचा उल्लेख कथितपणे ‘छोटा मराठा’ असा करण्यात आल्याचा दावा मराठा क्रांती मोर्चाने केला आहे. या शब्दाबाबत तीव्र नाराजी मराठा क्रांती मोर्चाने केली आहे. या संदर्भात सेन्सॉर बोर्ड व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे. या चित्रपटावरील छोटा मराठा हा भाग हटविण्याची मागणी करण्यात आली आहे.


‘Made In India: A Titan Story’ Review : घड्याळाच्या काट्यांपलीकडची स्वप्नांची आणि जिद्दीची प्रेरणादायी कहाणी

मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठा समाज हा महाराष्ट्राच्या सामाजिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य घटक आहे. अशा समाजाचा उल्लेख कोणत्याही चित्रपटात कमीपणा दर्शविणाऱ्या शब्दांत होणे समाजाच्या भावना दुखावणारे असल्याचा दावा त्यांनी केला आहे. ‘छोटा मराठा’ हा शब्दप्रयोग समाजात मोठा-छोटा असा भेद निर्माण करणारा आहे. तो समाजाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारा असल्याचे मोर्चाचे म्हणणे आहे.

Mansoon : अडकलेल्या ‘मान्सून’ची तारीख ठरली! शेतकऱ्यांनो चिंता सोडा, पेरणीला लागा…

निर्माता-दिग्दर्शक संजीवकुमार राठोड यांच्या ‘द महाराष्ट्र फाईल’ या चित्रपटाची प्रदर्शना आधीपासूनच मोठ्या प्रमाणात चर्चा होती. राज्यातील प्रशासकीय यंत्रणा, सामाजिक प्रश्न आणि विविध संवेदनशील विषयांवर भाष्य करणारा हा चित्रपट असल्याने त्याच्या आशयाबाबत अनेकस्तरांवर चर्चा रंगली होती. चित्रपटाच्या सेन्सॉर प्रक्रियेदरम्यानही काही अडथळे आल्याची चर्चा होती. मात्र आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून चित्रपटाला प्रदर्शनाची परवानगी मिळाली आणि त्यानंतर राज्यातील विविध चित्रपटगृहांमध्ये तो प्रदर्शित झाला.

चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही प्रेक्षकांनी त्यातील विषय मांडणीचे कौतुक केले. तर काही सामाजिक संघटनांनी चित्रपटातील काही संदर्भांवर आक्षेप नोंदवले. आता मराठा क्रांती मोर्चाने उपस्थित केलेल्या मुद्द्यामुळे हा वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version