सनी देओल यांचा आजवर न पाहिलेला अंदाज! ‘SURYAA: अंत से आरंभ तक’ चित्रपटाचा दमदार मोशन पोस्टर प्रदर्शित

SURYAA Ant Se Aarambh Tak अभिनेता सनी देओल ‘SURYAA’ या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर एका वेगळ्याच रूपात येण्यास सज्ज झाले आहेत.

Surya

Surya

The powerful motion poster of Sunny Deols film ‘SURYAA: Ant Se Aarambh Tak’ has been released : अभिनेता सनी देओल ‘SURYAA’ या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर एका वेगळ्याच रूपात येण्यास सज्ज झाले आहेत. चित्रपटाच्या निर्मात्यांनी आज या चित्रपटाचे दमदार मोशन पोस्टर प्रदर्शित केले. त्यासोबतच हा चित्रपट २० नोव्हेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असल्याची घोषणाही करण्यात आली. रापलेला चेहरा, थकलेले व्यक्तिमत्त्व आणि गुंतागुंतीच्या भूतकाळाचे ओझे घेऊन वावरणारे सनी देओल यांचे या चित्रपटातील पहिले रूप त्यांच्या आतापर्यंतच्या पडद्यावरील प्रतिमेपेक्षा वेगळे आहे. त्यांच्या नजरेतील गांभीर्य आणि व्यक्तिमत्त्वातील अस्वस्थता एका अशा व्यक्तीची झलक दाखवते, जी मागे पडलेल्या आयुष्याच्या आठवणी आणि आता टाळता न येणाऱ्या सत्याच्या कचाट्यात अडकली आहे. चित्रपटाविषयी बोलताना सनी देओल म्हणाले, “भूतकाळ आणि वर्तमान यांच्या कचाट्यात अडकलेले सत्य आता समोर येणार आहे! सादर आहे ‘SURYAA: अंत से आरंभ तक’! २० नोव्हेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहांत!”

हिमाचल प्रदेशातील प्राचीन देवी मंदिरांच्या शतकानुशतकांच्या गाथांचा उलगडा; Times Music Spiritual ची विशेष डॉक्युमेंटरी सीरिज

चित्रपटाचे मोशन पोस्टर ‘अंत से आरंभ तक’ या प्रभावी टॅगलाईनभोवती गुंफलेल्या एका रहस्यमय जगाची झलक दाखवते. जेव्हा भूतकाळ आणि वर्तमान एकमेकांसमोर उभे ठाकतात, तेव्हा न सुटलेले प्रश्न आणि दडलेली सत्ये यांच्या जाळ्यात अडकलेल्या एका व्यक्तीचा प्रवास उलगडू लागतो. सुरुवातीला साधा तपास वाटणारी ही कथा पुढे अशा वळणावर पोहोचते, जिथे परिस्थिती अपेक्षेपेक्षा अधिक गुंतागुंतीची बनते. रहस्य, भावना आणि संघर्ष यांनी भरलेल्या या कथेतून एक उत्कंठावर्धक गुन्हेगारीपट साकारला आहे.

‘सगळे रस्ते देवाभाऊंकडेच जातात’; नितेश राणेंची रोहित पवारांना भाजप प्रवेशाची ऑफर, ठाकरे बंधूंवरही निशाणा

चित्रपटाचे निर्माते कमल मुकुट यांनी या चित्रपटामागील संकल्पना स्पष्ट करताना सांगितले, “मी सनी देओल यांना ‘गदर २’ आणि ‘SURYAA’ या दोन चित्रपटांसाठी करारबद्ध केले होते. आम्ही ‘गदर २’पासून सुरुवात केली आणि त्या चित्रपटाने इतिहास घडवला. त्याच्या यशातून प्रेरणा घेत आणि चित्रपटसृष्टीतील पाच दशकांहून अधिक अनुभवाच्या बळावर मी ‘SURYAA’ची निर्मिती केली. हा एका सामान्य माणसाचा प्रवास आहे, जो निश्चितच प्रत्येकाच्या मनाला भिडेल. या चित्रपटात सनी देओल अशा रूपात दिसतील, जे प्रेक्षकांनी यापूर्वी कधीही पाहिलेले नाही. विशेष म्हणजे, ही कथा त्यांच्या आयुष्यातील तीन वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये गुंफण्यात आली आहे. हा उत्कंठावर्धक चित्रपट प्रेक्षकांना दोन वेगवेगळ्या कालखंडांतील जगाची सफर घडवण्यासाठी सज्ज आहे.”

Drishyam The Conclusion ची बॉक्स ऑफिसवर दमदार वाटचाल; 500 कोटींच्या क्लबमध्ये करणार प्रवेश

चित्रपटातील सनी देओल यांचा पूर्णपणे बदललेला लूक आणि त्यांचा गंभीर, संयत अभिनय अनेक प्रश्न उपस्थित करतो. त्यांचे नेमके उद्दिष्ट काय आहे, एवढाच प्रश्न या कथेत महत्त्वाचा नाही, तर त्यांना असे व्यक्तिमत्त्व मिळण्यामागे कोणते अनुभव कारणीभूत ठरले, हेदेखील जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण होते. ‘SURYAA’मध्ये सनी देओल एका वेगळ्या नाट्यमय भूमिकेत दिसणार आहेत. अंतर्मनातील संघर्ष, रहस्यमय तपास आणि त्यांच्या अभिनयातील तीव्रता यांचा अनोखा संगम या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

Onion Price : कांद्याचे दर कमी होणार; मोदी सरकार घेणार मोठा निर्णय?

या गुन्हेगारीपटात अभिनेता रवी किशन आणि अभिनेत्री प्रज्ञा जैस्वाल यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. त्यांच्या सहभागामुळे चित्रपटातील कलाकारांची फळी अधिक प्रभावी झाली आहे.एम. पद्मकुमार यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या ‘SURYAA’ची निर्मिती MM Moviez या निर्मिती संस्थेच्या बॅनरखाली करण्यात आली आहे. दीपक मुकुट, हेमंत मुकुट आणि लोकेश मुकुट हे चित्रपटाचे निर्माते आहेत. कमल मुकुट यांचाही या चित्रपटाच्या निर्मितीमध्ये सहभाग आहे.

ज्ञानेश कुमारांचा माझ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न, पण… राहुल गांधींचा थेट इशारा

मोशन पोस्टरच्या माध्यमातून चित्रपटाने आपल्या रहस्यमय कथाविश्वाची झलक प्रेक्षकांसमोर आणली आहे. आता या कथेतील गूढ उलगडण्याची उत्सुकता वाढली आहे. कारण या चित्रपटाची संकल्पनाच अशी आहे की, कदाचित एखाद्या गोष्टीचा शेवट हीच नव्या सुरुवातीची नांदी ठरू शकते. ‘SURYAA: अंत से आरंभ तक’ — 20 नोव्हेंबर 2026 रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार.

Exit mobile version