Download App

The Railway Man: ‘द रेल्वे मॅन’ने नेटफ्लिक्सवर रोवला यशाचा झेंडा, “आतापर्यंतचा बनला यशस्वी…”

The Railway Man On Netflix: आर माधवन (R Madhavan) स्टारर वेब सिरीज ‘द रेल्वे मॅन’ (The Railway Man) गेल्या वर्षी ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर (Netflix) रिलीज झाली होती. सस्पेन्स आणि थ्रिलने भरलेली ही वेब सिरीज प्रेक्षकांना खूप आवडली.

‘द रेल्वे मॅन’ हा नेटफ्लिक्सचा सर्वात यशस्वी भारतीय शो बनला : ही वेब सिरीज नेटफ्लिक्सची आतापर्यंतची सर्वात यशस्वी भारतीय मालिका बनली आहे. काही वेळातच या वेब सिरीजने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. नेटफ्लिक्सवर आणि YRF ने सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे. हे शेअर करताना नेटफ्लिक्सने असेही सांगितले की, रेल्वे मॅन गेल्या 100 दिवसांपासून टॉप 10 मालिकांच्या यादीत ट्रेंड करत आहे.

‘या’ कलाकारांनी मने जिंकली: चार भागांच्या या वेब सिरीजमध्ये चार हिरो दिसत आहेत. आर माधवन व्यतिरिक्त दिव्येंदू, केके मेनन आणि बाबिल खान देखील या मालिकेत दिसले आहेत. या सर्व कलाकारांनी आपल्या दमदार अभिनयाने या मालिकेत जीव ओतला आहे. अभिनयासोबतच त्याच्या कथेनेही प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ही वेब सिरीजम तुम्हाला शेवटच्या भागापर्यंत खिळवून ठेवणार आहे.

Sanki: अहान शेट्टीसोबत रोमान्स करताना दिसणार पूजा हेगडे, आगामी सिनेमाची केली घोषणा

अशी आहे ‘द रेल्वे मॅन’ची कहाणी: या वेब सिरीजचे दिग्दर्शन शिव रवैल यांनी केले आहे. ‘द रेल्वे मॅन’ भोपाळ वायू दुर्घटनेतील गायब झालेल्या नायकांची कहाणी दाखवते, ज्यांनी लोकांच्या सेवेत आपल्या जीवाची पर्वा केली नाही. मालिकेची कथा या चार मुख्य पात्रांभोवती फिरते.

ही मालिका 100 कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आली: ‘द रेल्वे मॅन’ची निर्मिती यशराज एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली करण्यात आली आहे. YRFची ही पहिली वेब सीरीज आहे. यासाठी आदित्य चोप्राने करोडो रुपये खर्च केले आहेत. चार नायकांसह वेब सीरिजचे बजेट जवळपास 100 कोटी रुपये असल्याची जोरदार चर्चा आहे.

follow us