केरळनं मारली बाजी; भारतातील पहिले सरकारी मालकीचे OTT प्लॅटफॉर्म ‘C Space’ लॉन्च

  • Written By: Published:
केरळनं मारली बाजी; भारतातील पहिले सरकारी मालकीचे OTT प्लॅटफॉर्म ‘C Space’ लॉन्च

OTT Platform ‘CSpace’ : केरळने आज (दि.7) भारतातील पहिले सरकारी मालकीचे OTT प्लॅटफॉर्म ‘C Space’ लाँच केले आहे. या OTT प्लॅटफॉर्मचा (OTT Platform) उद्देश लोकांना अर्थपूर्ण माहिती प्रदान करणे आणि या क्षेत्रातील अफाट संधींचा लाभ देणे हा आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी आज कैराली थिएटरमध्ये OTT प्लॅटफॉर्म लाँच केले. सी स्पेसचे व्यवस्थापान केरळ राज्य चित्रपट विकास महामंडळ (KSFDC) द्वारे केले जाणार असून केरळ सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या समर्थनाखाली याचे कार्य चालवले जाणार आहे. (Kerala Launches India’s First Government-Owned OTT Platform CSpace)

ठाकरे-पवारांचं रौद्र रूप! लोकसभेपूर्वीच ‘दोन जखमी वाघांची’ डरकाळी; अनेकांना धसका

CSpace मध्ये काय आहे खास

  • आज केरळ सकराने लाँच केलेल्या देशातील पहिल्या OTT प्लॅटफॉर्मबद्दल अनेकांना उत्सुकता असून, CSpace हे भारतातील पहिले सरकारी मालकीचे OTT प्लॅटफॉर्म आहे. जे केरळ राज्य चित्रपट विकास महामंडळ आणि सांस्कृतिक व्यवहार विभागाच्या मदतीने सुरू करण्यात आले आहे.
  • या प्लॅटफॉर्मवर दाखवण्यात येणाऱ्या सामग्रीची निवड आणि त्याच्या मंजुरीसाठी KSFDC ने 60 सदस्यांचे क्युरेटर पॅनेल तयार केले आहे. यात बेंजामिन, ओवी उषा, संतोष सिवन, श्यामा प्रसाद, सनी जोसेफ आणि जिओ बेबी यांसारख्या राज्यातील नामवंत सांस्कृतिक व्यक्तींचा समावेश आहे.हॅलो ‘आयरिस’ मॅडम! आता केरळच्या विद्यार्थ्यांना शिकवणार पहिली एआय शिक्षिका; काय आहे खासियत?
  • क्युरेटर्स पॅनलने CSpace च्या पहिल्या टप्प्यासाठी याआधीच 42 चित्रपटांची निवड केली आहे. ज्यामध्ये 35 फीचर फिल्म्स, सहा डॉक्युमेंट्री आणि एक शॉर्ट फिल्मचा समावेश आहे. याशिवाय राष्ट्रीय किंवा राज्य पुरस्कार जिंकलेले आणि मोठ्या चित्रपट महोत्सवांमध्ये प्रदर्शित झालेले चित्रपटांचादेखील या प्लॅटफॉर्मवर देण्यात येणाऱ्या ऑफरचा भाग असणार आहेत.
  • CSpace एक पे-पर-व्ह्यू मॉडेलवर आधारित असून यासाठी यूजर्सना प्रति मुव्हीसाठी 75 रूपये शुक्ल मोजावे लागणार आहे. आकारलेल्या रकमेपैकी निम्मी रक्कम कंटेट प्रोव्हाईड करणाऱ्याकडे जाते.
  • खाजगी ओटीटी प्लॅटफॉर्म सर्वात मोठ्या प्रमाणात बोलल्या जाणाऱ्या भाषेतील चित्रपटांना महत्त्व देते कारण, यातून त्यांचा जास्तीत जास्त नफा मिळवणे हा हेतू असतो. मात्र, दुसरीकडे CSpace चे प्राधान्य कलात्मक आणि सांस्कृतिक मूल्यांसह सामग्री दाखवण्याचा उद्देश आहे. यामुळे  मल्याळम भाषा आणि संस्कृतीचा प्रचारासही मदत होणार असल्याचे केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी सांगितले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube