Ghar Banduk Biryani : दिमाखदार म्युझिक लाँचमध्ये ‘आहा हेरो’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : झी स्टुडिओज् आणि नागराज पोपटराव मंजुळे नवाकोरा चित्रपट घेऊन येत आहेत.’घर, बंदूक, बिरयानी’ असं या चित्रपटाचं नाव आहे. हा चित्रपट 7 एप्रिल 2023 पासून सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचं पोस्टर दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुळे यांनी सोशल मिडीयावर शेअर केले आहे. या चित्रपटातील ‘गुन गुन’ हे गाणं मराठी प्रेक्षकांच्या मनात […]

Ghar Banduk Biryani 2

Ghar Banduk Biryani 2

मुंबई : झी स्टुडिओज् आणि नागराज पोपटराव मंजुळे नवाकोरा चित्रपट घेऊन येत आहेत.’घर, बंदूक, बिरयानी’ असं या चित्रपटाचं नाव आहे. हा चित्रपट 7 एप्रिल 2023 पासून सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचं पोस्टर दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुळे यांनी सोशल मिडीयावर शेअर केले आहे.

या चित्रपटातील ‘गुन गुन’ हे गाणं मराठी प्रेक्षकांच्या मनात घर केल्यानंतर आता ‘घर बंदूक बिरयानी’तील ‘आहा हेरो’ हे आणखी एक गाणं झळकले आहे. नुकताच ‘घर बंदूक बिरयानी’चा भव्य म्युझिक लाँच दिमाखदार सोहळा पार पडला. या जबरदस्त गाण्याला प्रवीण कुवर, विवेक नाईक, संतोष बोटे, राहुल चिटणीस यांचा आवाज लाभला असून ‘घर बंदूक बिरयानी’ हे टायटल सॉन्ग बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक मोहित चौहान यांनी गायले आहे. गणेश आचार्य यांचे नृत्य दिग्दर्शन लाभलेले हे जबरदस्त गाणे सयाजी शिंदे आणि आकाश ठोसर यांच्यावर चित्रीत करण्यात आले आहे.

Gulmohar : ‘…म्हणून मी चित्रपट साईन करायचे’ शर्मिला टागोरांनी सांगितलं कारण

यावेळी दिग्दर्शक हेमंत जंगल अवताडे, नागराज पोपटराव मंजुळे, सयाजी शिंदे आकाश ठोसर, सायली पाटील, संगीतकार ए. व्ही. प्रफुल्लचंद्र, गीतकार वैभव देशमुख, झी स्टुडिओजचे मंगेश कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. ‘आहा हेरो’ या गाण्याच्या प्रदर्शनासोबतच ‘घर बंदूक बिरयानी’चे मेकिंगही या वेळी दाखवण्यात आले. या म्युझिक लाँच सोहळ्यात ‘आहा हेरो’ या गाण्यावर गाण्यातील कलाकार, ए. व्ही. प्रफुल्लचंद्रा यांनी ठेका धरला.

या चित्रपटात यांच्या स्वत: नागराज मंजुळे प्रमुख भूमिका साकारणार आहे. तसेच नागराजसोबतच सयाजी शिंदे, आकाश ठोसर हे देखील या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन नागराज आणि हेमंत आवताडे यांनी केलं आहे. दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुळे यांच्या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. त्यामध्ये आता या चित्रपटाचं पोस्टर दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुळे यांनी सोशल मिडीयावर शेअर केल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.

Exit mobile version