Gulmohar : ‘…म्हणून मी चित्रपट साईन करायचे’ शर्मिला टागोरांनी सांगितलं कारण
मुंबई : जेष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर (Sharmila Tagore), त्यांचं सौंदर्य, अदा, अभिनय आणि गालावर पडणारी खळी अशी त्यांची ओळख सांगता येते. गेली अनेक वर्ष त्या चित्रपटसृष्टीवर राज्या करत आहेत. ब्लॅक अॅन्ड व्हाईटच्या काळापासून ते आजच्या ओटीटीपर्यंत त्यांची जादू कायम आहे. आता त्यांचा ‘गुलमोहर’ हा चित्रपट ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मोठ्या ब्रेकनंतर आता त्या पुन्हा अभिनय क्षेत्रात परतणार आहेत. सध्या त्या आता त्यांचा ओटीटीवरील आगामी चित्रपट ‘गुलमोहर’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत यावेळी त्यांनी एका वाहिनीला मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी त्यांच्या जुन्या आठवणी आणि काही गुपितं देखील सांगितले. त्यांनी सांगितले की, त्या चित्रपट कशा आणि का साईन करायच्या ?
Threat : अंबानी, बच्चन अन् धर्मेंद्र यांच्या घराबाहेर बॉम्ब लावलाय…
शर्मिला म्हणाल्या की, ‘आम्ही व्यावसायिक आहोत आणि चित्रपट साईन करण्यामागे अनेक कारणे असतात. भाडे भरण्यासाठीही अनेकवेळा आम्ही केवळ एक रुपयात चित्रपट साईन केले आहेत. अनेक वेळा तर सहकार्यांना मदत करण्यासाठी चित्रपट साईन केले आहेत. जेणेकरून त्यांचा प्रकल्प चांगला चालेल. अशा प्रकारे चित्रपट साईन करण्यामागे अनेक कारणं असतात. मुख्यतः चित्रपटाची स्क्रिप्ट हेच चित्रपट निवडण्याचे कारण असायचे.’असंही त्या यावेळी म्हणाल्या.
‘गुलमोहर’बद्दल शर्मिला म्हणतात, ‘मला वाटतं सगळ्यांना तो आवडेल. मी ते तीनदा पाहिला आहे आणि प्रत्येक वेळी मी रडले आहे. चित्रपटाची कथा उत्तम पद्धतीने लिहिली गेली आहे. मनोज आणि सूरज या सगळ्या कलाकारांनी आपलं बेस्ट दिलंय.
‘गुलमोहर’ या चित्रपटापबद्दल सांगायचे झाले तर हा चित्रपट डिज्नी प्लस हॉटस्टारवर 3 मार्चला रिलीज होणार आहे. यामध्ये शर्मिला यांच्यासोबत मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) आणि सुरज शर्मा (Suraj Sharma) देखील असणार आहेत. या चित्रपटामध्ये शर्मिला ‘कुसुम’ या महिलेची भूमिका साकरणार आहे. जी दिल्लीत राहते. तिला तिचं मोठ घर विकायचं अहे. यामुळे तिच्या कुटुंबातील सदस्यांना धक्का बसतो. जेष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी ‘अराधना’, ‘चुपके चुपके’, ‘अमर प्रेम’, ‘अविष्कार’, ‘अनुपमा’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.