The team is preparing to secure exclusive rights signature move of Allu Arjun After ‘Pushpa’ of ‘Raka’ : ‘राका’बाबत दररोज नवनवीन चर्चा समोर येत आहेत आणि आता चित्रपटाशी संबंधित एका खास माहितीनं चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढवली आहे. अल्लू अर्जुनच्या दमदार पडद्यावरील उपस्थितीमुळे आणि त्यांच्या आयकॉनिक शैलीमुळे निर्माते यावेळीही काहीतरी मोठं करण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे. विशेषतः चित्रपटातील सिग्नेचर मूव्हबाबत टीम खूप सावध असल्याचं सांगितलं जात आहे, जेणेकरून त्याची वेगळी ओळख कायम राहील आणि तो योग्य पद्धतीने सादर केला जाईल.
थलापती विजय यांच्या दरबारातून ज्योतिषाची एक्झिट; स्वतःचं ‘भविष्य’ ओळखण्यात पंडितजी फेल!
चित्रपटसृष्टीतील सूत्रांच्या माहितीनुसार, निर्माते आणि अल्लू अर्जुनची टीम ‘राका’मधील सिग्नेचर मूव्हचे हक्क स्वतःकडे सुरक्षित ठेवण्याच्या तयारीत आहे. अल्लू अर्जुनची प्रचंड लोकप्रियता आणि ‘पुष्पा’मधील ‘झुकेगा नहीं साला’ या गाजलेल्या मूव्हचा विक्रम लक्षात घेता, ‘राका’मधील सिग्नेचर स्टेपचे हक्क सुरक्षित राहावेत आणि त्याचा कोणताही व्यावसायिक गैरवापर होऊ नये, यासाठी ही खबरदारी घेतली जात असल्याचं बोललं जात आहे. ‘पुष्पा’मधील हा प्रसिद्ध मूव्ह जागतिक स्तरावर प्रचंड गाजला होता. जगभरातील नेते, क्रिकेटपटू आणि चाहत्यांनी तो पुन्हा साकारला होता.
MIM नगरसेवक मतीन पटेलच्या घरावर ‘बुलडोझर’ निदा खानला मदत करणं भोवलं
हे निश्चितच अल्लू अर्जुन यांच्या पडद्यावरील प्रभावाची ताकद दाखवते, जी आता ‘राका’मुळे आणखी एका नव्या उंचीवर पोहोचताना दिसत आहे. ‘पुष्पा २ : द रूल’ने विक्रमी यश मिळवल्यानंतर आता या चित्रपटातून एक पूर्णपणे नवं विश्व उभं केलं जात असल्याची चर्चा आहे. याशिवाय दिग्दर्शक अॅटलीसोबतचं त्यांचं सहकार्यही दोन मोठ्या शक्तींचं एकत्र येणं मानलं जात असून, यातून काहीतरी भव्य घडण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
