Download App

अजय देवगणचा ‘भोला’ चित्रपटाचा ट्रेलर या दिवशी होणार प्रदर्शित

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि तब्बूचा बहुप्रतिक्षित भोला या सिनेमाचा ट्रेलरची तारीख जाहीर झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चाहते या सिनेमाच्या ट्रेलर आणि चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकतेच सिनेमाच्या ट्रेलरची रिलीज डेट समोर आली आहे. अजय देवगणने त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करून चित्रपटाचा ट्रेलरची डेट जाहीर केली आहे.

अजय देवगणने त्याच्या इंस्टाग्रामवर चित्रपटाशी संबंधित एक धमाकेदार व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले – भोला वेडेपणा सुरू होतो, #BholaaTrailerOutTomorrow at 2:18pm. #BholaaOn30thMarch. चित्रपटाचा ट्रेलर आयमॅक्स थिएटरमध्ये थ्रीडी स्वरूपात प्रदर्शित होणार आहे. या पोस्टनंतर आता चाहते खूप उत्सुक दिसत आहेत.

या पोस्टवर चाहत्यांकडून कमेंट केल्या जात आहे. एकाने लिहिले – प्रतीक्षा करू शकत नाही. दुसर्‍याने लिहिले – अति उत्साही. तिथे आणखी एक लिहिले होते – भोला आग का गोला. एकाने लिहिले – मी भोलाबद्दल खूप उत्सुक आहे, थांबू शकत नाही.

Uddhav Thackeray : आमच्यावर घराणेशाहीचा आरोप करता, तुमचा आगापिछा काय?

विशेष म्हणजे या सिनेमाची निर्मिती आणि दिग्दर्शन अजय देवगणने केली होती. हा चित्रपट दक्षिण चित्रपट ‘कैथी’चा अधिकृत हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात पुन्हा एकदा अजयसोबत तब्बूची जोडी पाहायला मिळणार आहे. याशिवाय दीपक डोबरियाल, गजराज राव आणि विनीत कुमारही या चित्रपटात आहेत. अजयने या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली आहे. हा चित्रपट 30 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Tags

follow us