‘त्या’ तोतऱ्याला खरा हातोडा झेपल का? उद्धव ठाकरेंची सोमय्यांवर टीका
रत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून राज्यात विरोधकांवर ईडीच्या कारवाया सुरु आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप – प्रत्यारोप होत आहे. यातच अनिल परब, राजन साळवी अशा अनेकांच्या मागे ईडीच्या चौकश्या लावल्या आहेत. मात्र ‘तो’ तोतरा थर्माकोलचा हातोडा घेऊन निघतो त्याला कधी खरा हातोडा झेपल का? अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपनेते किरीट सोमय्या यांच्यावर टीका केली आहे.
शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह गेल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे रत्नागिरीत आज सभा घेत आहे. खेडच्या गोळीबार मैदानात त्यांची आज सभा पार पडत आहे. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह भाजपवर जोरदार टीका केली आहे.
ठाकरे म्हणाले, मी घरी बसून महाराष्ट्र सांभाळला, यांना देशभर फिरुन, गुवाहाटीला जाऊन तो सांभाळता येत नाही, यांचा अर्धा वेळ तर दिल्लीत मुजरा करायला जातोय अशी टीका ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली.
देशावर कोरोनाचे संकट होते. मात्र या कोरोना काळातही पंतप्रधान मोदींचे नाही तर मुख्यमंत्र्यांचे कौतुक झाले. कारण मुख्यमंत्र्यांच्या कामाचे कौतुक झाले. कोरोना काळातही उद्योगधंदे महाराष्ट्रात येत होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून उद्योगधंदे गुजरात मध्ये जातायत. निवडणुकांच्या उद्देशाने त्या त्या राज्यात उद्योगधंदे स्थलांतरित केले जात आहे.
अनेकांनी टीका केली की दोन वर्षे मी घरातच होतो. हो मी घरातच होतो कारण कोरोनाचा काळ होता. मात्र या कोरोना काळात देखील उत्तम रित्या मी जनतेची काळजी घेतली. तसेच मी जर महाराष्ट्र सांभाळला नसता तर महाराष्ट्राची दुरावस्था झाली असती. एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे उत्तरप्रदेशमध्ये कोरोना मृतदेहाची अक्षरशः विटंबना झाली. अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी उत्तरप्रदेशमधील भाजपासरकारवर टीका केली आहे.
एकीकडं राज्यातील सरकार गतिमान महाराष्ट्राचे नारे लावत आहे. मात्र ज्या बसवर तुम्ही सरकारची ही जाहिरात करत आहे. त्याबसची झालेली दुरावस्था तर पहा. ज्या एसटीबसवर गतिमान महाराष्ट्र असलेलं तुमचे फोटो आहेत त्या बसची दुरावस्था झाली आहे. त्याच्या काचा खिळखिळल्या आहेत. अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.
चोर म्हटल्यावर आशिष शेलारांना राग का येतो? सुषमा अंधारेंचा सवाल
भाजपात आज सर्वाधिक भ्रष्टाचारी
आज विरोधकांचा आवाज दडपला जातो आहे. त्यांच्या चौकश्या लावल्या जात आहे. त्यांच्या मागे ईडी, सीबीआय यांचा वापर करत विरोधकांना धमकावले जात आहे. मात्र चौकशी होणारे भाजपात गेले कि त्यांच्या चौकश्या तात्काळ थांबवल्या जात आहे. आता हे करत असताना भाजपात सर्वाधिक भ्रष्टाचारी गोळा झाले आहे.