अंबरनाथमध्ये भाजपचं ऑपरेशन लोटस यशस्वी; काँग्रेसच्या तब्बल 12 नगरसेवकांनी केला भाजपमध्ये प्रवेश

भाजप-काँग्रेस युतीच्या नाट्यानंतर आता काँग्रेसचे नगरसेवक थेट भाजपमध्ये दाखल झाल्याने ‘ऑपरेशन लोटस’ यशस्वी झाल्याचे चित्र.

  • Written By: Published:
Untitled Design (222)

As many as 12 Congress corporators in Ambernath join BJP : अंबरनाथ नगरपरिषद निवडणुकीनंतर भाजपने काँग्रेससोबत युती करत आघाडी स्थापन केली होती. या अनपेक्षित युतीमुळे सत्ताधारी आणि विरोधकांकडून तीव्र टीका होत असतानाच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अंबरनाथमधील काँग्रेसच्या 12 नगरसेवकांना बुधवारी निलंबित केले होते. या निर्णयानंतर अवघ्या एका दिवसात, गुरुवारी, निलंबित करण्यात आलेल्या सर्व 12 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. नवी मुंबईत पार पडलेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि वनमंत्री गणेश नाईक उपस्थित होते. दरम्यान, या नगरसेवकांना आपल्या गोटात घेण्यासाठी शिंदे गटाच्या शिवसेनेकडूनही प्रयत्न सुरू होते. मात्र भाजपने वेळीच संधी साधत सर्व नगरसेवकांना पक्षप्रवेश दिला.

भाजप-काँग्रेस युतीच्या नाट्यानंतर आता काँग्रेसचे नगरसेवक थेट भाजपमध्ये दाखल झाल्याने ‘ऑपरेशन लोटस’ यशस्वी झाल्याचे चित्र आहे. राज्यभरात भाजपकडून राबवण्यात येणाऱ्या ऑपरेशन लोटसचा भाग म्हणूनच अंबरनाथ नगरपरिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी ही रणनीती आखण्यात आल्याचे बोलले जात आहे. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ नगरपरिषदेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपने मोठे नियोजन केले होते. भाजपचे 16, काँग्रेसचे 12 आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे 4 असे एकूण 32 नगरसेवक एकत्र येत भाजप-काँग्रेस आघाडी स्थापन झाली होती. या आघाडीच्या माध्यमातून शिंदे गटाच्या शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवण्यात आले होते. मात्र, याच निर्णयामुळे काँग्रेस नेतृत्वाने आपल्या प्रदीप नाना पाटील, दर्शना उमेश पाटील, अर्चना चरण पाटील, हर्षदा पंकज पाटील, तेजस्विनी मिलिंद पाटील, विपुल प्रदीप पाटील, मनीष म्हात्रे, धनलक्ष्मी जयशंकर, संजवणी राहुल देवडे, दिनेश गायकवाड, किरण बद्रीनाथ राठोड, कबीर नरेश गायकवाड या 12 नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई केली.

विरोधी पक्षांना आणखी एक मोठा धक्का; प्रतोदांनाही आता मंत्रिपदाचा दर्जा आणि सुविधा नाहीत.

निलंबनानंतर काँग्रेस नगरसेवकांची कोंडी झाली होती. त्यातच आता अंबरनाथ काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रदीप पाटील हेही 12 नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, पक्षप्रवेशावेळी बोलताना प्रदीप पाटील यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर गंभीर आरोप केले. ब्लॉक अध्यक्षपदासाठी आपल्याकडून एक कोटी रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या युतीबाबत आपण आधीच काँग्रेस नेतृत्वाला माहिती दिली होती, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपमध्ये प्रवेश केल्याचे प्रदीप पाटील यांनी स्पष्ट केले.

follow us