The Traitors Season-2 : करण जोहरच्या होस्टिंगमुळे चर्चेत असलेला ‘द ट्रेटर्स’ (The Traitors) हा रिअॅलिटी शो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पहिल्या पर्वाला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर आता ‘द ट्रेटर्स सीझन 2’ ची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. हा शो 13 ऑगस्टपासून Amazon Prime Video वर स्ट्रीम होणार आहे. यंदाच्या पर्वात एकूण 21 सेलिब्रिटी स्पर्धक सहभागी होणार आहेत.
मुंबईत आयोजित भव्य कार्यक्रमात प्राइम व्हिडिओने या सर्व स्पर्धकांच्या नावांची घोषणा केली. अभिनेत्री मल्लिका शेरावत आणि मुनव्वर फारुकी यांच्या सहभागाची घोषणा याआधीच करण्यात आली होती. आता उर्वरित स्पर्धकांचीही अधिकृत यादी समोर आली आहे.
‘द ट्रेटर्स 2’मधील 21 स्पर्धक
1) मल्लिका शेरावत -‘मर्डर’ आणि ‘वेलकम’सारख्या चित्रपटांमधून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री. या शोद्वारे ती पहिल्यांदाच रिअॅलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून दिसणार आहे.
2) रिया चक्रवर्ती – अभिनेत्री रिया चक्रवर्ती ‘द ट्रेटर्स 2’मधून स्पर्धक म्हणून पदार्पण करत आहे. याआधी ती ‘एमटीव्ही रोडीज’मध्ये गँग लीडर म्हणून झळकली होती.
3) मुनव्वर फारुकी – ‘लॉक अप’ आणि ‘बिग बॉस 17’चा विजेता असलेला लोकप्रिय स्टँडअप कॉमेडियन आता फसवणूक आणि रणनीतीवर आधारित या खेळात नशीब आजमावणार आहे.
4) अभिषेक मल्हान (फुक्रा इन्सान) – लोकप्रिय यूट्यूबर आणि कंटेंट क्रिएटर.
5) श्वेता तिवारी – छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अनेक वर्षांनंतर पुन्हा एका मोठ्या रिअॅलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून दिसणार आहे.
6) दलीप ताहिल – बॉलिवूडमधील अनुभवी अभिनेते.
7) क्रिस्टल डिसूझा – अभिनेत्री.
8) शालिनी पासी – सोशलाइट आणि टीव्ही व्यक्तिमत्त्व.
9) रणवीर ब्रार – प्रसिद्ध शेफ, अभिनेता आणि ‘मास्टरशेफ’चे परीक्षक0
10) आदित्य कुलश्रेष्ठ (कुल्लू) – सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर
11) रिदा थराना – फॅशन आणि ब्युटी इन्फ्लुएन्सर
12)-शाहनील गिल – क्रिकेटपटू शुभमन गिलची बहीण आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर.
13) साऊंडूस मौफाकीर – ‘स्प्लिट्सव्हिला’, ‘रोडीज’ आणि ‘खतरों के खिलाडी’मधून लोकप्रिय झालेली रिअॅलिटी स्टार.
14) हरमन सिंघा – रणविजय सिंघाचा भाऊ आणि अभिनेता.
15) तान्या पुरी – भारतातील सर्वात तरुण खासगी गुप्तहेर म्हणून ओळख
16) अंश चोप्रा – सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर
17) करण सिंह – मेंटलिस्ट आणि माइंड रीडर
18) इक्का – लोकप्रिय रॅपर
19) पारुल गुलाटी – अभिनेत्री आणि उद्योजिका
20) प्रिश – सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर; यंदाच्या पर्वातील सर्वात तरुण स्पर्धक
21) साहिल सलाथिया – पहिल्या पर्वात लवकर बाहेर पडलेला अभिनेता यंदा पुन्हा स्पर्धेत पुनरागमन करणार आहे.
जैसलमेरमध्ये झाले शूटिंग
‘द ट्रेटर्स 2’चे शूटिंग राजस्थानमधील जैसलमेरच्या सूर्यगढ पॅलेसमध्ये मार्च आणि एप्रिल महिन्यात पार पडले. हा शो 13 ऑगस्टपासून Amazon Prime Video वर स्ट्रीम होणार असून, दर गुरुवारी मध्यरात्री 12 वाजता नवीन भाग प्रदर्शित केला जाणार आहे.
गेल्या वर्षीच्या पहिल्या पर्वात उर्फी जावेद आणि निकिता लुथर यांनी विजेतेपद पटकावत 70 लाख रुपयांचे बक्षीस जिंकले होते. आता दुसऱ्या पर्वात कोण रणनीती, विश्वासघात आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर विजेतेपद पटकावणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
