अजित पवारांच्या आणखी एका आमदाराच्या अडचणी वाढल्या; पोलिसांना शिवीगाळ कारेमारेंना न्यायालयाची दोन वर्षांची तंबी

कोकाटे यांनी राजीनामा दिल्यानंतर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे भंडाऱ्याचे आमदाराच्या देखील अडचणी वाढल्या आहेत.

News Photo   2025 12 17T230540.328

अजित पवारांच्या आणखी एका आमदाराच्या अडचणी वाढल्या; पोलिसांना शिवीगाळ कारेमारेंना न्यायालयाची दोन वर्षांची तंबी

Another MLA of Ajit Pawar’s troubles increase; Court sentences two years to Karemare for abusing police : राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे हे 30 वर्षांपूर्वीच्या सदनिका गैरव्यवहार प्रकरणात अडचणीत आले आहेत. शासकीय कोट्यातील 10 टक्के सदनिका गैरव्यवहार प्रकरणी दोन वर्षे आणि 10 हजार दंडाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयानेही कायम ठेवली आहे. त्यानंतर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे भंडाऱ्याचे आमदाराच्या देखील अडचणी वाढल्या आहेत.

मोठी बातमी! अखेर माणिकराव कोकाटेंचा मंत्रिपदाचा राजीनामा

पोलिसांना शिवीगाळ कारेमारेंना न्यायालयाची दोन वर्षांची तंबी

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे भंडाऱ्याचे आमदार राजू कारेमोरे हे पोलिसांना शिवीगाळ प्रकरणामध्ये दोषी ठरवले गेले आहेत. त्यांना न्यायालयाने दोन वर्ष शिस्तीत राहण्याची तंबी देत त्यांच्या चार सहकाऱ्यांची बंद पत्रकावर सुटका केली आहे. हे प्रकरण म्हणजे कारेमोरे यांच्या तीन वर्षांपूर्वी आमदार राजू कारेमोरे यांच्या मित्राचे 50 लाख रूपये पोलिसांनी लुटल्याची घटना घडली होती. तेव्हा आमदारांनी पोलिसांना शिवीगाळ केल्याचं प्रकरण दाखल झालं होतं. त्यानंतर आता त्यांना न्यायालायाने कारेमोरे हे एक लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांची चांगली वागणूक असल्याने त्यांना न्यायालयाने केवळ दोन वर्षांत कुणासोबत वाद भांडण आढळल्यास अटी-शर्तीवर त्यांना मुक्त केलं आहे.

दरम्यान राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate ) यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला असून त्यांच्याकडे असलेल्या क्रीडाखात्याचा कार्यभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. सदनिका गैरव्यवहार प्रकरणी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांकडून त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती. त्याआधीच कोकोटे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलायं.

Exit mobile version