Download App

Masoom The Next Generation चित्रपटाचा येणार सीक्वल; अभिनेत्रीने पोस्ट करत म्हणाली…

Actor Shabana Azmi Post: शेखर कपूर (Shekhar Kapur) दिग्दर्शित डेब्यू चित्रपट मासूम हा भारतात एक कल्ट क्लासिक म्हणून ओळखला जाणारा चित्रपट होता. या चित्रपटात नसीरुद्दीन शाह आणि शबाना आझमी (Shabana Azmi) मुख्य भूमिकेत होते आणि आता शेखर कपूर ‘मासूम… द नेक्स्ट जनरेशन’ वर काम करत आहेत.


शेखर कपूर यांच्या अलिकडच्या सोशल मीडिया (Social media) पोस्ट वरून आता काही नव्या चर्चांना उधाण आलं आणि दिग्गज अभिनेत्री शबाना आझमी या देखील बहुप्रतिक्षित सिक्वेलचा एक भाग होणार का ? हा सवाल सध्या सर्वत्र होत असल्याचे पाहायला मिळत आहे. शेखर कपूर यांनी २१ ऑक्टोबर १९८३ रोजी मासूम दिग्दर्शित केला होता. या चित्रपटाने भारतीय चित्रपटसृष्टीत कल्ट क्लासिक चित्रपटाचा देखील दर्जा प्राप्त केला.

शेखर कपूरच्या “बॅन्डिट क्वीन” आणि “मिस्टर इंडिया” सारख्या इतर आयकॉनिक चित्रपटाने भारतीय चित्रपट उद्योगाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला आहे. चित्रपटसृष्टीतील शेखर कपूर या यांच्या योगदानामुळे केवळ भारतीय चित्रपट घडले नाही, तर त्यांच्या एलिझाबेथ आणि ‘एलिझाबेथ: द गोल्डन एज’ ​​या ऑस्कर पुरस्कार विजेत्या चित्रपटांसह आंतरराष्ट्रीय स्तरावरही सन्मान झाला.

Karan Kundra Look: स्वातंत्र्य दिनासाठी अभिनेता करण कुंद्राची अनोखी फॅशन पाहिली का?

कोण आहे अभिनेत्री शबाना आझमी?

शबाना आझमी यांनी १९७४ साली प्रदर्शित झालेल्या ‘अंकुर’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले. त्यांनी आजवर १२० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यामध्ये हिंदी आणि बंगाली चित्रपटांचा समावेश आहे. त्यांनी राष्ट्रीय चित्रपटांप्रमाणेच अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपटांमधून भूमिका वठविल्या आहेत. जुनून’, ‘शतरंज के खिलाडी’, ‘कंधार’, ‘स्पर्श’, ‘पार’, ‘सती’, ‘अर्थ’ आणि ‘गॉडमदर’ या चित्रपटांमधून त्यांनी अभिनयाचा ठसा उमटवला. त्यांची प्रत्येक भूमिका त्यावेळी हिट ठरत होती. त्यांनी काही हॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे.

Tags

follow us