Aparshakti Khurana: अभिनेता आमीर खान अभिनीत ‘दंगल’ (Dangal) चित्रपटातून अभिनेता अपारशक्ती खुराना (Aparshakti Khurana) घराघरात पोहचला. या सिनेमात तो हरियाणवी मुलाच्या भूमिकेत दिसला होता. ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली. त्याची खूप प्रशंसा झाली होती. त्यानंतर आता अभिनेता अपारशक्ती खुराणा त्याच्या भन्नाट एनेर्जीसाठी ओळखला जात आहे आणि म्हणून तो नेहमीच सोशल मीडियावरून (social media) असेच भन्नाट मजेशीर व्हिडिओ शेयर करताना दिसत आहे.
अपारने नुकताच एक व्हिडिओ शेयर करून प्रेक्षकांच मनोरंजन केलं आहे. हा व्हिडिओ अपारशक्तीचा विनोद आणि फिटनेससाठी यांचा अनोखा मिलाफ दाखवतो यात शंका नाही. अभिनेता एखादी भूमिका मनापासून करतो. तसेच तो भूमिकेसाठी खूप मेहनत देखील घेत असतो. त्याच्या मते, भूमिकेत मग्न झाले पाहिजे. भूमिका साकारत असताना त्यात कोणतीही कमतरता ठेवली नाही पाहिजे. अपारशक्तीने दंगल चित्रपटाच्या वेळी हरियाणवी भाषा शिकला असून त्याचे लहेजा देखील आत्मसात दाखवला आहे. दंगलच्यावेळी घेतलेले हे प्रशिक्षण आता त्याला आगामी चित्रपट ‘राजमा चावल’च्या वेळी उपयोगी येणार आहे.
या चित्रपटातील भूमिका त्याला सहजरित्या साकारता येणार आहे. भलेही या सिनेमाच तो हरियाणवी असला तरी ही भूमिका ‘दंगल’ चित्रपटापेक्षा खूप अनोखी आहे. याबाबत अभिनेत्याने सांगितलं की,’ एक कलाकार म्हणून मी मानतो की प्रत्येक भूमिका वेगळ्या प्रकारे निभावली पाहिजे. तसेच दुसरी भाषा शिकणे व त्यांची संस्कृती स्वीकारणे खूपच इंटरेस्टिंग असते. मला अशा भूमिका साकारायला खूप मजा येत असते. त्यातून एक अनोखा आनंद मिळत असतो. अपारशक्ती खुरानाला ‘राजमा चावल’मधून पुन्हा एकदा हरियाणवी भूमिकेत बघायला कमालीचे ठरणार आहे.
अभिनेत्याच्या वर्कफ्रंटवर ‘स्त्री 2’ मध्ये बिट्टूच्या त्याच्या प्रिय भूमिकेची पुनरावृत्ती करताना दिसणार आहे. त्याचा ‘बर्लिन’ हा आंतरराष्ट्रीय ख्यातीचा चित्रपट रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. तो ‘फाइंडिंग राम’ आणि नवज्योत गुलाटी दिग्दर्शित ‘बदतमीज गिल’ नावाच्या माहितीपटात देखील दिसणार आहे, आणि तो वाणी कपूर, परेश रावल आणि शीबा चढ्ढा यांच्यासोबत स्क्रीन स्पेस शेअर करणार आहे.