Download App

Tiger 3 चं नवं पोस्टर लॉंच; नव्या लूकमध्ये दिसला भाईजान सलमान खान

Tiger 3 : किंग खानच्या जवाननंतर आता भाईजान सलमान खानचा टायगर 3 (Tiger 3) देखील बॉक्स ऑफिसवर (box office) धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाल्याचे बघायला मिळत आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता भाईजानचं नवं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. त्यामध्ये सलमानचा नवा लूक समोर आला आहे. दरम्यान मंगळवारी 10 ऑक्टोबरला चित्रपटातील नायिका कॅटरिना कैफ हीचं पोस्टर प्रदर्शित झालं होतं.

विश्वास नव्हता पण नशीबच चमकलं; PSI ऑनलाईन गेम खेळला अन् दीड कोटी जिंकला

या नव्या पोस्टरमधील सलमाना नवा लूक पाहून चाहते चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. सलमानने हे पोस्टर त्याच्या सोशल मीडियावर शेअर केले आहे. यामध्ये त्याने लिहीले की, टायगर येत आहे. 16 ऑक्टोबरला ट्रेलरसाठी रेडी रहा. फक्त 5 दिवस बाकी, या दिवाळीला चित्रपटगृहांमध्ये येणार टायगर 3. हिंदीसह तमिळ आणि तलुगुमध्येही होणार रिलीज.’

गेल्या काही दिवसांपासून ‘टायगर 3’च्या (Tiger 3) टीझरविषयी जोरदार चर्चा रंगत होती. नुकतंच यश चोप्रा यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने यश राज फिल्म्सनी त्यांच्या ‘स्पाय युनिव्हर्स’मधला पुढचा सिनेमा ‘टायगर 3’चा प्रोमो सोशल मीडियावर प्रदर्शित केला आहे. या प्रोमोत ‘भाईजानचा एक मेसेज’ आपल्याला बघायला मिळाला आणि त्यासोबतच भाईजानचा एक हटका अंदाज देखील बघायला मिळाला आहे. ‘टायगर 3’ या सिनेमाच्या प्रोमोला भाईजानच्या चाहत्यांनी भरभरून प्रेम दिल आहे. तेव्हापासून या ट्रेलरची चाहते आतुरतेने वाट बघत असल्याचे बघायला मिळत होते.

पालकांनो, मुलांकडे लक्ष द्या, आम्ही मुलांकडं लक्ष देऊनही ते….; ललित पाटीलच्या आईची प्रतिक्रिया

नुकतंच ‘यश राज फिल्म्स’नी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर ‘टायगर 3’चं एक नवं पोस्टर शेयर करत सिनेमाच्या ट्रेलरची देट समोर आली आहे. या पोस्टरमध्ये भाईजानच्या हातात बंदूक घेऊन सावधपणे उभा असलेल्या लुक सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषौ बनला आहे. या पोस्टमध्ये सिनेमाच्या ट्रेलर प्रदर्शनाची डेट देखील जाहीर करण्यात आली. येत्या 16 ऑक्टोबर दिवशी ‘टायगर 3’चा ट्रेलर चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. भाईजानचे चाहते यांनी आत्तापासूनच काऊंटडाउन सुरू केलं आहे.

Tags

follow us