पालकांनो, मुलांकडे लक्ष द्या, आम्ही मुलांकडं लक्ष देऊनही ते….; ललित पाटीलच्या आईची प्रतिक्रिया

  • Written By: Published:
पालकांनो, मुलांकडे लक्ष द्या, आम्ही मुलांकडं लक्ष देऊनही ते….; ललित पाटीलच्या आईची प्रतिक्रिया

Lalit Patil Mother Reaction : ड्रग्ज तस्कर ललित पाटील (Lalit Patil) याने पोलिसांच्या हातावरू तुरी देऊन पळ काढला. या घटनेला आता नऊ दिवस झाले. मात्र पुणे पोलिसांना (Pune Police) अद्याप ललित पाटीलचा शोध लागला नाही. दरम्यान, या प्रकरणात राजकीय नेत्यांनीही उडी घेत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू केलेत. या घटनेत राज्य सरकारमधील मंत्र्यांचा हात असल्याचा आरोप विरोधकांनी केला. अशातच ललितच्या आईची प्रतिक्रिया समोर आली आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून माझा माझ्या दोन मुलांशी कोणताही संबंध नाही, असं सांगत पालकांनो, तुमच्या मुलांकडे लक्ष द्या, असं आवाहनही त्यांनी केलं.

Amitabh Bachchan यांचा वाढदिवस अन् किरण मानेची खास पोस्ट; ‘बच्चन’ मनात, मेंदूत-रक्तात धगधगतोय 

ललितची आई म्हणाली की, गेल्या तीन-चार वर्षांपासून ललितशी आमचा कोणताही संबंध नाही. त्याचा भाऊ भूषण हाही गेल्या काही महिन्यांपासून आमच्या संपर्कात नाही. आमची मुलं ड्रग्ज प्रकरणात आहेत, हे आम्हाला बातम्यांच्या माध्यमातून कळलं. जेव्हा आम्हाला मुलांची भानगड कळली, त्यावेळी माझ्या पतीला जबर धक्का बसला. सध्या त्यांना एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, असं ललितच्या आईने सांगितलं.

त्या म्हणाल्या, पोलिसांनी ललित पाटील आणि भूषण पाटील यांच्या घराची झडती घेतली. झडतीत पेनड्राईव्ह सापडले असून पोलिसांनी आमचे मोबाईलही जप्त केले. त्या म्हणाल्या की, ललित यापूर्वी एका वाईन कंपनीत काम करत होता. पुढे तीन ते चार वर्षे ललित परदेशी शेळी, बोकड विक्रीचा व्यवसाय करत होता. तो टेलिफोन एक्सचेंजमध्येही काम करत होता. भूषणचं लग्न झालंय, त्याची पत्नी गरोदर आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

यावेळी त्यांनी पालकांना विनंती केली. लक्ष देऊनही आमची मुलं ड्रग्ज प्रकरणात गेली, इतर पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष द्यावं, अशी कळकळीचं आवाहन त्यांनी केलं.

ललित पाटील प्रकरणात आता राजकीय नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या प्रकरणात शिंदे गटाचे नेते सहभागी असल्याचा आरोप पुण्याचे आमदार रवींद्र धंगेकर, सुषमा अंधारे यांनी केला आहे, तर ललित पाटीलचे उद्धव ठाकरेंसोबतचे फोटो शिंदे गटाकडून व्हायरल झाले. या व्हारयल फोटोची चौकशी करण्याची मागणी शिंदे गटाने केली. दरम्यान, या प्रकरणात पुढं काय होतं, हेच पाहणं महत्वाचं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube