Download App

सहकलाकारासाठी Tiger Shroff चा मदतीचा हात; 10 वर्षांपुर्वी केलं होतं एकत्र काम

Tiger Shroff एका खास कारणासाठी चर्चेत आला आहे. त्याने 10 वर्षांपुर्वी एकत्र काम केलेल्या सहकलाकारांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.

Tiger Shroff Helps Ex Crew Member : अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) त्याच्या अॅक्शनसह अभिनयासाठी नेहमीट चर्चेत असतो. मात्र यावेळी तो एका खास कारणासाठी चर्चेत आला आहे. हे कारण म्हणजे त्याने 10 वर्षांपुर्वी एकत्र काम केलेल्या सहकलाकारांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांच्या वाईट काळामध्ये टायगर धावून गेला आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

निर्माते वाशु भगनानी यांच्या बड़े मियां छोटे मियांसह तीन प्रोजक्ट्समध्ये काम केलेल्या कलाकरांना पैसे देण्यात न आल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यामध्येच याच एका प्रोजक्टमधील रवि कुमार यांना देखील पैसे न मिळाल्याने त्यांची परिस्थिती हालाखीची असल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे या माजी सहकलाकार राहिलेल्या कुमार यांना टायगर श्रॉफने मदतीचा हात पुढे केला आहे.

मायदेशी परतताच Team India चा जल्लोष; ढोल-ताशावर थिरकल्यानंतर पंतप्रधानांच्या भेटीला

त्यांच्या वाईट काळामध्ये टायगर धावून गेला आहे. 45 वर्षीय रवि कुमार गेल्या वर्षी एका दुर्घटनेमध्ये सापडले होते. त्यानंतर ते 8 महिने अंथरूणाला खिळून होते. बरे झाल्यानंतर ते काम करत होते. मात्र त्यांना पर्कृती ठिक नसल्याने जास्त काम मिळत नव्हते.

Alia Bhatt : आलिया भट्टकडून मोठी घोषणा; म्हणाली, ‘मला सांगायला आनंद होतोय की…’

ज्यामुळे मिळालेल्या पैशांमधून त्यांच्या उदरनिर्वाहासह त्यांच्या दवाखान्याचा खर्च देखील भागत नव्हता. तसेच 2022 त्यांनी काम केलेला हसबंड की बीवी या रिलीज न झालेल्या चित्रपटाचे देखील त्यांना पैसे मिळाले नव्हते. मात्र आता त्यांना टायगर श्रॉफने मदतीचा हात पुढे केल्याने त्यांना लाखोंची मदत मिळाल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

follow us

वेब स्टोरीज