मायदेशी परतताच Team India चा जल्लोष; ढोल-ताशावर थिरकल्यानंतर पंतप्रधानांच्या भेटीला

मायदेशी परतताच Team India चा जल्लोष; ढोल-ताशावर थिरकल्यानंतर पंतप्रधानांच्या भेटीला

T-20 World Cup winner Team India meet to PM Modi : भारतीय क्रिकेट संघाने (Team India) टी 20 विश्वचषक जिंकला (T-20 World Cup winner). यानंतर बेरिल नावाच्या चक्रीवादळाने भारतीय संघाच्या प्रवासात आडकाठी आणली होती. मात्र आता टीम इंडिया भारतात दाखल झाली आहे. यावेळी मायदेशी परताच खेळाडूंनी जल्लोष केल्याचं पाहायला मिळालं. यामध्ये रोहित आणि सुर्या भारतात दाखल होताच ढोल-ताशावर थिरकले. तर आता भारतीय संघ पंतप्रधान मोदी (PM Modi) यांच्या भेटीसाठी रवाना झाला आहे.

Alia Bhatt : आलिया भट्टकडून मोठी घोषणा; म्हणाली, ‘मला सांगायला आनंद होतोय की…’

तर नुकतेच टीम इंडिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहे थोड्याच वेळात या सर्व खेळाडूंना पंतप्रधान नरेंद्र मोदी भेटून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करतील. या अगोदर 2023 मधील विश्वचषकातील पराभवानंतर देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीम इंडियाचा मनोबल वाढवलं होतं. त्यानंतर आता कौतुकाची थाप देखील पंतप्रधान मोदी देणार आहे.

कहर! बिहारमध्ये १५ दिवसांत सात पूल कोसळले, विरोधकांकडून मुख्यमंत्री नितीशकुमार लक्ष

दरम्यान दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर खेळाडूंना भेटण्यासाठी चाहते अगोदरच एक दाखल झाले होते. त्यावेळी कर्णधार रोहित शर्माने चहा त्यांना विश्वचषक ऊन जाऊन दाखवला. यावेळी चहा त्यांनी एकच जल्लोष केला होता. त्यानंतर ज्या हॉटेलमध्ये टीम इंडिया पोहोचली त्या ठिकाणी चहा त्यांनी गेटवरच सर्व खेळाडूंचे जल्लोषात स्वागत केलं यावेळी कर्णधार रोहित शर्मा सह सूर्यकुमार यादव आणि यशस्वी जयस्वाल यांनी मुंबई स्टाईल गणपती डान्स केल्याचे पाहायला मिळालं.

टीम इंडियाच्या या प्लॅनिंगनुसार खेळाडू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीमध्ये भेट घेत आहेत. त्यानंतर ते मुंबईला रवाना होणार आहेत. या ठिकाणी ते वानखेडे स्टेडियम जवळ एका ओपन बसमध्ये रॅली काढत सेलिब्रेशन करणार आहेत. तसेच स्टेडियमवर टीम इंडियाच्या विजयाचा छोटासा सोहळा देखील होणार आहे. तसेच त्यानंतर भारतीय खेळाडू त्यांच्या चाहत्यांना नवी दिल्ली आणि मुंबई या ठिकाणी भेटी देणार आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज