Tiger Shroffs Ganpath Movie Journey: बॉलीवूडमध्ये (Bollywood) प्रत्येक फ्रायडेला सिनेमाचं आणि कलाकारच भवितव्य ठरवलं जात असत. बॉक्स ऑफिसच्या (Box Office) इन्कमवर देखील प्रत्येक कलाकार आणि सिनेमा यांची प्रतिमा ठरवली जात असते. टायगर श्रॉफचा (Tiger Shroffs) त्याचा अलीकडील सिनेमा ‘गणपथ’ ने (Ganapath Movie) फार अपेक्षित कमाई केली नसली तरी देखील त्याची कलाकारी कारकिर्दी ही बॉक्स ऑफिसवर अनोखी ठरली आहे.
‘हीरोपंती’ (Heropanti Movie) सारख्या सिनेमाने ज्याने बॉक्स ऑफिसवर (Box Office) मोठी 6.8 कोटी कमावले आणि हा त्याचा धमाकेदार पहिला सिनेमा होता, ज्याने इंडस्ट्रीमध्ये त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. ‘बागी’, ‘बागी 2’, आणि अॅक्शन-पॅक्ड ‘वॉर’ यांसारख्या आणि त्यानंतरच्या सिनेमानी त्याच्या कारकिर्दीचा काळ हा अतिशय उल्लेनीय ठरला आहे. सुरुवातीच्या आकड्यांना मागे टाकून आणि थिएटरमध्ये गर्दी खेचून आणण्याची त्याची क्षमता ही चाहत्यांनी चांगलीच पाहिली आहे.
बॉक्स ऑफिसची संख्या कायम बोलली जाते आणि म्हणून ‘बागी 2’ ने ‘बागी’च्या कलेक्शनपेक्षा दुप्पट कलेक्शन केल्याचे पहिले आहे, ज्याने 25 कोटीचा गल्ला कमावला होता. ‘वॉर’ या सिनेमात देखील ज्यामध्ये त्याने हृतिक रोशनसोबत स्क्रीन शेअर केल्याचे बघायला मिळाले आहे. आणि त्याने बॉक्स ऑफिसवर तब्बल 53 कोटींचा गल्ला जमा केला होता. त्याच्या कारकिर्दीत एक नवीन उच्चांक गाठला आहे. कोविड सारख्या आव्हानात्मक काळात देखील “बागी 3 “ने सुरुवातीच्या काळात 17 कोटींची दमदार गल्ला कमावला होता.
Short And Sweet: सोनाली कुलकर्णीचे आई-बाबा झळकणार ‘शॉर्ट अँण्ड स्वीट’मध्ये
गेल्या काही दिवसापूर्वी ‘गणपथ’ ला 4 कोटींचा ओपनिंग मिळाली आणि मोठा प्रतिसाद मिळून देखील बॉलिवुड उद्योगातील एका उल्लेखनीय सूत्राने सांगितले आहे की, टायगरमध्ये उल्लेखनीय सातत्य आहे, आणि त्याची सुरुवात त्याच्या पिढीतील अनेक कलाकारांसाठी अतुलनीय ठरणार आहे. हे आकडे त्याचे बॉक्स ऑफिस ड्रॉ आणि चाहत्यांसाठी पोस्टर बॉय म्हणून त्याची प्रतिमा निर्माण करणारी आहे.
जगन शक्ती दिग्दर्शित “बडे मियाँ छोटे मियाँ,” “हिरो नंबर 1,” मध्ये अक्षय कुमार सोबत अभिनय करत सिद्धार्थ आनंद निर्मित रॅम्बो आणि अलीकडेच रोहित शेट्टी यांच्यासाठी हैदराबादमध्ये काही नेत्रदीपक अॅक्शन पॅक साठी टायगर त्याच्या आगामी प्रोजेक्ट साठी सज्ज होणार आहे, सध्या ‘सिंघम अगेन’ मध्ये तो झळकणार आहे.