Download App

‘TMKOC …’ मधील मस्तीखोर टप्पू दिसणार निगेटिव्ह भूमिकेत, मोठ्या ब्रेकनंतर इंडस्ट्रीत कमबॅक

Bhavya Gandhi Movie: टीव्ही मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) अनेक वर्षांपासून लोकांचे मनोरंजन करत आहे.

Bhavya Gandhi Movie: टीव्ही मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) अनेक वर्षांपासून लोकांचे मनोरंजन करत आहे. गेल्या काही वर्षांत शोमधील अनेक पात्रे बदलली आहेत. ‘भव्य गांधी’ (Bhavya Gandhi Movie) यांनी पहिल्यांदा ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये (TMKOC) टप्पूची भूमिका साकारली होती. त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळालं आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये अनेक वर्षे काम केल्यानंतर भव्यने शो सोडला.


आता बऱ्याच कालावधीनंतर तो टीव्हीवर पुनरागमन करणार आहे. भव्या अशा अवतारात दिसणार आहे, ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल. तो खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. भव्यने एक पिरियड फिल्मही साइन केला आहे. पिंकविलासोबतच्या खास संवादात, भव्यने त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल सांगितले. त्याचा गुजराती चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असल्याचे त्यांनी सांगितले. ओम स्वीट ओम असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाचे शूटिंग लंडनमध्ये झाले आहे. मला आशा आहे की प्रेक्षकांना हा चित्रपट आवडेल.

सुनील शेट्टीसोबत काम करणार

भव्य गांधी म्हणाला की, मी एका पीरियड फिल्ममध्येही काम करणार आहे. केसरी वीर असे या चित्रपटाचे नाव आहे. सुनील शेट्टी, विवेक ओबेरॉय आणि सूरज पांचोली या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. आजकाल भव्य त्याच्या करिअरचा सध्याचा टप्पा एन्जॉय करत आहे. तो त्याच्या भूमिकांमध्ये प्रयोग करत आहे आणि नवीन संधी शोधत आहे.

आत्माराम तुकाराम भिडे ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ सोडणार? अभिनेत्याने सांगितलं कारण, म्हणाला

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, भव्य गांधी यांचा ‘अजब रात नही गजब’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत आरोही पटेल मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 15 नोव्हेंबर 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट कॉमेडी, ड्रामा आणि रोमान्सने परिपूर्ण आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रेम गडली आणि किलोल परमार यांनी केले आहे.

follow us