Download App

‘कळत नकळत’ मुंबईतील प्रदर्शनास ३५ वर्ष पूर्ण; वेगळी थीम, संयत हाताळणी, दर्जेदार अभिनय म्हणून ओळख

या चित्रपटाची पटकथा व संवाद शं. ना. नवरे यांची असून गीते सुधीर मोघे यांची तर संगीत आनंद मोडक यांची आहेत. छायाचित्रण

  • Written By: Last Updated:

Kalat N Kalat Marathi Movie Complete 35 Year : वेगळी थीम, संयत हाताळणी, दर्जेदार अभिनय, उत्तम संगीत आणि दिग्दर्शक टच अशा वैशिष्ट्यांनी आजही ओळखल्या जात असलेल्या अस्मिता चित्रचा, स्मिता तळवलकर निर्मित व कांचन नायक दिग्दर्शित ‘कळत नकळत ‘ या चित्रपटाच्या मुंबईतील प्रदर्शनास (Marathi Movie) आज २५ जानेवारी रोजी ३५ वर्ष पूर्ण झाले आहेत.

मराठी चित्रपटसृष्टीत नवा प्रयोग ; ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ होणार नाट्यगृहात प्रदर्शित

हा चित्रपट ११ डिसेंबर १९८९ रोजी सेन्सॉर संमत झाला तर २५ जानेवारी १९९० रोजी प्लाझा चित्रपटगृहात तर २६ जानेवारी १९९० रोजी गिरगावातील सेन्ट्रल, लालबागचे भारतमाता इत्यादी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. हा चित्रपट शकुंतला गोगटे यांच्या ‘शून्याची व्यथा कादंबरी’ या कथेवर आधारित आहे.

या चित्रपटाची पटकथा व संवाद शं. ना. नवरे यांची असून गीते सुधीर मोघे यांची तर संगीत आनंद मोडक यांची आहेत. छायाचित्रण राजन किणगी यांचे आहे. या चित्रपटात विक्रम गोखले, सविता प्रभुणे, अश्विनी भावे, सुलभा देशपांडे, अशोक सराफ, राजा मयेकर, अनंत मिराशी, चंदू पारखी इत्यादींच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटातील अशोक सराफ यांनी गायलेले नाकावरच्या रागाला औषध काय? हे गाणे आजही लोकप्रिय आहेत.

follow us