कंगना रनौतच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाच्या स्क्रीनिंगला CM फडणवीसांची हजेरी, अभिनेत्रीच्या अभिनयाचे केलं कौतूक…
Emergency Film : अभिनेत्री कंगना रनौतचा ‘इमर्जन्सी’ चित्रपट १७ जानेवारीला प्रदर्शित होतोय. गुरुवारी मुंबईत या चित्रपटाचे स्किनिंग झाले.

Emergency Film : गेल्या वर्षभर रखडलेला बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतचा (Kangana Ranaut) ‘इमर्जन्सी’ चित्रपट (Emergency Film) १७ जानेवारीला प्रदर्शित होतोय.

गुरुवारी मुंबईत या चित्रपटाचे स्किनिंग झाले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या चित्रपटाच्या स्क्रीनिंगला हजेरी लावली.

देवेंद्र फडणवीस स्क्रिनिंगला पोहोचताच कंगनाने मुख्यमंत्री फडणवीसांचे हात जोडून केलं.

या चित्रपटात कंगनाने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली. चित्रपट पाहिल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी कंगनाच्या अभिनयाचे कौतुक केले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी इमर्जन्सीच्या स्क्रिनिंगला हजरी लावल्याने कंगना रनौत खूप आनंदी दिसत होती.

दरम्यान, ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन कंगनाने केले. तर चित्रपटाचे लेखन रितेश शाह यांनी केले आहे.
